‘काली’ या माहितीपटाचे वादग्रस्त पोस्टर समोर आल्यानंतर त्याविरोधात सर्वत्र निदर्शने होत आहेत. सोशल मीडियावरही ‘काली’ची निर्माती लीना मणिमेकलाईविरोधात आवाज उठवला जात आहे. दरम्यान, ‘काली’च्या वादावर एका प्रसिद्ध हिंदी चित्रपट निर्मात्याने तिखट प्रतिक्रिया दिली आहे, तर लीना मणिमेकलाईवर निशाणा देखील साधला आहे.
‘या’ चित्रपट निर्मात्याने साधला लीना मणिमेकलाईवर निशाना
सोशल मीडियावर ‘काली’चे वादग्रस्त पोस्टर शेअर केल्यानंतर लीना मणिमेकलाईच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत, बॉलिवूडचे प्रसिद्ध चित्रपट निर्माते अशोक पंडित (Ashoke Pandit) यांनी लीना मणिमेकलाई यांच्याविरोधात संताप व्यक्त केला आहे. अशोक पंडित यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर ट्वीट केले असून इस्लाम, शीख, ख्रिश्चन धर्माचा अपमान होत असेल तर तो अपमान असल्याचे लिहिले आहे. पण दुसरीकडे, जर एखाद्या व्यक्तीने हिंदू धर्माचा अपमान केला, तर ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य मानले जाते. मात्र, स्वत:च्या धर्माचा अपमान करणारी व्यक्ती स्वत: हिंदू असेल, तर प्रकरण आणखी सोपे आहे. (film maker ashok pandit furious on kaal documentary)
इस्लाम का अपमान अपमान है
क्रिरशचन का अपमान अपमान है
सिक्खों का अपमान अपमान है
हिन्दू का अपमान ?????
Freedom of expression है।
अगर करने वाला भी हिन्दू हो तो और भी आसान है। #LeenaManimekalai— Ashoke Pandit (@ashokepandit) July 8, 2022
पोस्टवर आल्या ‘अशा’ प्रतिक्रिया
चित्रपट निर्माते अशोक पंडित यांच्या या प्रतिक्रियेनंतर सोशल मीडियावर लोकांनी आपापल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. ज्याच्या आधारे एका ट्विटर युजरने ट्विट करून लिहिले आहे की, “आमची सर्वात मोठी कमजोरी ही आहे की आम्ही आमच्या धर्माचा अपमान सहन करतो.” आणखी एका युजरचे म्हणणे आहे की, “आता हिंदू धर्माच्या लोकांना सहनशीलता सोडावी लागेल.” एकप्रकारे इतरही अनेक लोक ‘काली’च्या वादग्रस्त पोस्टरविरोधात मत व्यक्त करत आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा