दिग्दर्शक-निर्मात्या कांचन अधिकारी यांची आई कुसुम शरद घरपुरे यांचे आज (१० ऑक्टोबर) सकाळी निधन झाले. त्यांचे वय ८६ वर्षे होते. शारीरिक आजारामुळे कुसुम यांचा मृत्यू झाला. मुंबईच्या विले पार्लेमध्ये राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कुसुम त्यांची मुलगी कांचन आणि मुलासोबत राहत होत्या.
कुसुम यांच्यावर आज विले पार्ले येथील पवन हंस स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येतील. अचानक आपल्या आईचे निधन झाल्यामुळे कांचन आणि तिच्या कुटुंबावर दु:खाचे डोंगर कोसळले आहे.
कांचनची आई कुसुम या भजन गायिका होत्या. त्यांनी वयाच्या १०व्या वर्षापासून भजन गायला सुरुवात केली होती. पुढे जाऊन त्यांनी भजनाचे वेगवेगळे कार्यक्रम केले. त्यांनी रेडिओवरील भजन कार्यक्रमही केले होते.
कांचन या मराठी आणि हिंदी चित्रपट निर्मात्या आहेत. त्यांनी किरण कुलकर्णी वर्सेस किरण कुलकर्णी, मोकळा श्वास, हु तू तू, इंडियन नेवर अगेन निर्भया, मानिनी, बाप रे बाप डोक्याला ताप, असे चित्रपट बनवले आहेत.










