Sunday, June 8, 2025
Home बॉलीवूड ‘सूर्यवंशी’ चित्रपटातील नवीन गाणं रिलीझ, ११ वर्षांनी पाहायला मिळाला कॅटरिना आणि अक्षयचा रोमँटिक अंदाज

‘सूर्यवंशी’ चित्रपटातील नवीन गाणं रिलीझ, ११ वर्षांनी पाहायला मिळाला कॅटरिना आणि अक्षयचा रोमँटिक अंदाज

सिनेसृष्टीमध्ये कॅटरिना कैफ आणि अक्षय कुमारची जोडी ‘तीस मार खान’ चित्रपटानंतर एकत्र दिसलीच नव्हती. चाहते या दोघांना एकत्र पाहण्याची अनेक वर्षांपासून वाट पाहत होते. अखेर ‘सूर्यवंशी’ चित्रपटामध्ये आता हे दोघे एकत्र झळकणार आहेत. नुकतेच या चित्रपटातील या दोन्ही कलाकारांचे एक रोमँटिक गाणे प्रदर्शित झाले आहे.

‘सूर्यवंशी’ चित्रपटातील ‘मेरे यारा’ हे गाणे पाहून चाहते खूप खुश आहेत. कारण, यामध्ये अक्षय आणि कॅटरिना या दोघांमधील लव्ह स्टोरी दिसत आहे. या गाण्यामधील त्यांचा रोमँटिक अंदाज चाहत्यांना खूप आवडला आहे. यामध्ये त्या दोघांचे प्रेम त्यांचे लग्न आणि नंतर त्यांना होणारी मुलं देखील दाखवण्यात आली आहेत. एकाच गाण्यात पूर्ण संसार दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. हे गाणे टी- सीरिजच्या यूट्यूब अकाऊंटवर प्रदर्शित करण्यात आले आहे. तसेच या गाण्याला आतापर्यंत २१ लाखापेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

‘मेरे यारा’ गाण्याचे बोल रश्मी विराग यांनी लिहिले असून कौशिक गुड्डू आणि आकाश या दोघांनी संगीत दिले आहे. तसेच प्रसिद्ध गायक अरिजित सिंगने या गाण्याला आपला आवाज दिला असून त्याला गायिका नीती मोहनने साथ दिली आहे.

कॅटरिना आणि अक्षयची जोडी या आधी ‘वेलकम’, ‘दे दनादन’, ‘सिंग इज किंग’ या चित्रपटांमध्ये झळकली आहे. त्यानंतर आता ११ वर्षांनी ही जोडी पुन्हा रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. ‘सूर्यवंशी’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अक्षय कुमार ‘द कपिल शर्मा शो’मध्ये पोहोचला होता. त्यावेळी तो म्हणाला की, “साल २०१० नंतर मी माझ्या अनेक चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी कॅटरिनाला विचारले होते. परंतु तिने नकार दिला होता.”

रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सूर्यवंशी’ हा ‘सिंघम’चा तिसरा पार्ट आहे. याचा दुसरा पार्ट ‘सिंबा’ हा चित्रपट होता. ‘सूर्यवंशी’ चित्रपटाचे या आधी आणखीन एक गाणे प्रदर्शित झाले होते. यामध्ये रणवीर सिंग, अजय देवगण आणि अक्षय कुमार यांचा धडाकेबाज डान्स पाहायला मिळाला. या गाण्याला देखील प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली. तसेच आता प्रदर्शित झालेले ‘मेरे यारा’ हे गाणे देखील सोशल मीडियावर ट्रेंड करू लागले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-उर्वशी रौतेलाची जादू पाहिली का? हवेत लटकताना दिसली काकडी; पाहून तुम्हीही व्हाल हैराण

-अंदमानातील सेल्युलर जेलला भेट देताना स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल गौरवोद्गार काढत कंगना म्हणाली…

-कॅन्सरवर उपचार सुरू असताना महेश मांजरेकरांनी केले होते ‘अंतिम’चे शूटिंग

हे देखील वाचा