Tuesday, July 9, 2024

फिल्मफेअर अवॉर्ड्स २०२१: इरफान खानला मिळाला सर्वोत्तम अभिनेत्याचा पुरस्कार, तर तापसी पन्नू ठरली सर्वोत्तम अभेनेत्री; पाहा संपूर्ण यादी

तमाम भारतीय चित्रपटप्रेमींना ज्या पुरस्कार सोहळ्याची आतुरता असते, तो पुरस्कार सोहळा म्हणजेच फिल्मफेअर होय. शनिवारी (२७ मार्च) संध्याकाळी मुंबई येथे 66 व्या फिल्मफेअर पुरस्काराचे आयोजन केले गेले होते. या पुरस्कार सोहळ्यात अनेक कलाकारांना पुरस्कार मिळाले, तर अनेकांना अपयश आले. या पुरस्कार सोहळ्यात दिवंगत अभिनेता इरफान खान याला ‘अंग्रेजी मीडियम’ या चित्रपटासाठी सर्वोत्तम अभिनेता म्हणून गौरविण्यात आले. इरफान खान आज आपल्यात नाहीये. मागील वर्षी 29 एप्रिल 2020 मध्ये त्याचा दीर्घ काळापासून असलेल्या कर्करोगाने मृत्यू झाला होता. इरफानला सर्वोत्तम अभिनेत्यासोबतच लाईफटाईम अचिवमेंट या पुरस्काराने गौरवण्यात आले. हा पुरस्कार त्याचा मुलगा बाबिल याने घेतला.

याव्यतिरिक्त तापसी पन्नू हिला सर्वोत्तम अभिनेत्री हा पुरस्कार मिळाला. तिला ‘थप्पड’ या चित्रपटासाठी हा पुरस्कार मिळाला आहे. थप्पड या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट कथा आणि एडिटिंगचा देखील पुरस्कार मिळाला आहे.

अमिताभ बच्चन यांनी ‘गुलाबो सिताबो’ या चित्रपटात बेस्ट एकटर क्रिटीक्सचा अवॉर्ड मिळाला आहे.सैफ अली खानला तानाजी: द अनसंग वॉरियर या चित्रपटासाठी बेस्ट एक्टर इन सपोर्टिंग रोल हा अवॉर्ड मिळाला आहे. या पुरस्कारात तापसी पन्नू, आयुष्मान खुराणा, सनी लिओनी, नोरा फतेही , रितेश देशमुख, राजकुमार राव या कलाकारांनी हजेरी लावली होती.

फिल्मफेअर पुरस्कार विजेत्यांची यादी खालीलप्रमाणे-

बेस्ट डायरेक्टर- ओम राऊत (तान्हाजी: द अनसंग वॉरियर)

बेस्ट फिल्म (क्रिटिक्स)- प्रतिक वत्स (Eeb Allay OOO)

बेस्ट एक्टर मेल- इरफान खान (इंग्रजी मीडियम)

बेस्ट ऍक्टर (क्रिटिक्स)- अमिताभ बच्चन (गुलाबो सिताबो)

बेस्ट ऍक्ट्रेस इन लिडिंग रोल- तापसी पन्नू ( थप्पड )

बेस्ट ऍक्ट्रेस (क्रिटिक्स) : तिलोत्तमा शोम (सर)

बेस्ट सपोर्टिंग ऍक्टर- सैफ अली खान (तान्हाजी: द अनसंग वॉरियर)

बेस्ट सपोर्टिंग ऍक्ट्रेस- फारुफ जाफर (गुलाबो सिताबो)

बेस्ट फिल्म- थप्पड

बेस्ट एडिटिंग- जुही चतूर्वेदी (गुलाबो सिताबो)

बेस्ट डेब्यू डायरेक्टर- राजेश कृष्णन (लूटकेस)

बेस्ट डेब्यू ऍक्ट्रेस- अलाया एफ (जवानी जानेमन)

बेस्ट म्युझिक- प्रीतम (ल्यूडो)

बेस्ट लिरिक्स-: गुलजार (छपाक)

बेस्ट कोरिओग्राफी- फराह खान (दिल बेचारा)

बेस्ट कॉस्च्युम डिसायनर- विरा कपूर ईई (गुलाबो सिताबो)

बेस्ट साऊंड डिझाइन- कमोद खारडे (थप्पड)

बेस्ट प्रोडक्शन डिझाईन- मानसी ध्रुव मेहता (गुलाबो सिताबो)

बेस्ट बॅकग्राउंड स्कोर– मंगेश उर्मिला धाकडे (थप्पड)

बेस्ट फिल्म (फिक्शन)- अर्जुन

बेस्ट फिल्म (नॉन फिक्शन)- बॅकयार्ड वाइल्डलाईफ सेंचुरी

बेस्ट ऍक्ट्रेस (पिपुल चॉईस फॉर शॉर्ट फिल्म)- पूर्ति सावरडेकर

बेस्ट ऍक्टर (शॉर्ट फिल्म)- अरनव

बेस्ट सिनेमॅटोग्राफी- अविक मुखोपाध्याय (गुलाबो सिताबो)

बेस्ट प्लेबॅक सिंगर (मेल)- राघव चैतन्य- एक तुकडा धूप (थप्पड)

बेस्ट प्लेबॅक सिंगर (फिमेल)- असिस कौर (मलंग)

बेस्ट एक्शन- रमजान बुलुत, आरपी यादव (तान्हाजी: द अनसंग वॉरियर)

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अमेरिकन पुरस्कार सोहळ्यात दिवंगत अभिनेता इरफान खानच्या नावात मोठी चूक, लिहिले…

हे देखील वाचा