अनेकांच्या प्रेमाला शब्दरुपी आयाम देणाऱ्या गुलजार यांचे प्रेम मात्र फुललेच नाही, वाचा संपुर्ण स्टोरी


वयाच्या विसाव्या वर्षी ‘जीवन मृत्यू’ या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरवात करणाऱ्या राखी ह्या एक सौंदर्यवती. सत्तरीच्या दशकातील त्या आघाडीच्या अभिनेत्री होत्या. राखी यांनी बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट केले आहेत. प्रथम अभिनेत्री म्हणून बरेच नाव कामावल्यानंतर आईच्या भूमिकेतून त्यांनी लोकांची मने जिंकली आहेत. आपल्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपट देणाऱ्या राखी यांचे जीवन बऱ्याच चढ उतारांनी भरलेले राहिले.

राखी यांचे पहिले लग्न बंगाली पत्रकार विजय बिश्वास यांच्याशी १९६३ मध्ये झाले होते. पहिल्या लग्नाच्या वेळी त्या फक्त सोळा वर्षाच्या होत्या. तथापि, लग्नाच्या दोन वर्षानंतर त्यांच्या घटस्फोट झाला. त्यानंतर त्यांनी गुलजार यांच्या सोबत दुसरा विवाह थाटला.

एकीकडे बॉलिवूडमध्ये यशस्वी अभिनेत्री म्हणून राखी प्रसिद्धीच्या शिखरावर होत्या. तर दुसरीकडे प्रतिभावंत कवी आणि गीतकार म्हणून गुलजार यांच्या गजलने रसिकांच्या मनात एक वेगळीच जादू निर्माण केली होती. एका बॉलिवूड पार्टीमध्ये दोघांची ओळख झाली होती आणि पाहताक्षणी गुलजार राखीच्या प्रेमात पडले.
आपापल्या क्षेत्रात मशहूर असलेल्या या दोघांनी हे १५ मे १९७३ रोजी एकमेकांशी विवाह केला. राखी यांचा आयुष्याचा गाडा सुरळीत चालू होता. त्यानंतर त्यांच्या आयुष्यात मेघना या मुलीचे आगमन झाले.

मेघनाच्या जन्मानंतर अवघ्या एका वर्षातच या जोडप्याच्या नात्यात दुरावा आला आणि दोघांनीही विभक्त होण्याचा निर्णय घेतला. असं म्हणतात की, लग्नानंतर गुलजार यांची राखी यांनी चित्रपटात काम करणे थांबवावे अशी इच्छा होती, त्यामुळे त्यांनी गुलजार यांना शब्द दिला. सिनेमात काम न करण्याचा शब्द जरी राखी यांनी दिला असला तरी गुलजार दिग्दर्शन करत असलेल्या सिनेमात छोटी- मोठी भूमिका मिळेलच, अशी त्यांची अपेक्षा होती. परंतु ती फोल ठरली. घरी राहून राहून त्यांना कंटाळा आला होता. सोबतच काही सिनेमांच्या ऑफर देखील आल्या, परंतु गुलजार यांना दिलेल्या शब्दामुळे त्यांनी त्या ऑफर नाकारल्या.

कोणत्याही घटस्फोटाच्या करारावर सही न करता ही हे दोघे अनेक वर्षे एकमेकांपासून दूर राहत आहेत आणि दूर राहिले तरीही एकमेकांविषयी त्यांचे प्रेम अद्याप कमी झाले नाही.

गुलजार आणि राखी यांची मुलगी मेघना गुलजार ही फिल्म इंडस्ट्रीची प्रसिद्ध दिग्दर्शक आहे. ती एक वर्षाची असतानाच हे दोघे विभक्त झाले होते. मेघना आता ४७ वर्षांची असून तीने फिलहाल, जस्ट मॅरिड, दस कहानिया, तलवार, राझी आणि छपाक अशा सिनेमांचे दिग्दर्शन व स्कीनप्ले केले आहे.

गुलजार यांच्यापासून विभक्त झाल्यावर राखीने अनेक हिट सिनेमे दिले. ज्यात कभी कभी, कसमे वादे, मूकद्दर का सिकंदर, दुसरा आदमी , जुरमाना, काला पत्थर यांचा समावेश होता. आजही राखीचे चित्रपट प्रेक्षक आवर्जून पाहतात, त्यातल्या त्यात करन अर्जुन हा तीचा चित्रपट विशेष गाजला.


Leave A Reply

Your email address will not be published.