Saturday, July 6, 2024

रिया कपूरच्या लग्नात का सहभागी झाली नव्हती बॉलिवूडमंडळी? लग्नपत्रिकेसह कारणही आले समोर

गेल्या काही दिवसांपासून कपूर कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. अलिकडेच १४ ऑगस्ट अनिल कपूर आणि सुनीता कपूर यांची धाकटी मुलगी रियाचा लग्नसोहळा पार पडला. रियाच्या लग्नात फारसे लोक उपस्थित नव्हते. रियाने तिच्या जवळच्या नातेवाईकांना आणि मित्रमंडळींना आमंत्रित केले होते. अनिल कपूरच्या जुहू बंगल्यात रियाचा लग्नसोहळा पार पडला. ती अभिनय क्षेत्रापासून दूर आहे. पण ती निर्मिती क्षेत्रात नक्कीच कमाल कार्य करते. सोबतच ती स्वतःचा फॅशन ब्रँड चालवते. शिवाय रिया सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते.

जॅकी श्रॉफच्या पत्नी आयशा श्राॅफ रियाच्या लग्नात उपस्थित नव्हत्या. पण आयशा यांनी रियाच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर शेअर केली आहे. सोबतच त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, रिया आणि करण बूलानीला लग्नाच्या शुभेच्छा देखील दिल्या. तसेच अनेक बाॅलिवूड कलाकार या लग्न सोहळ्यासाठी का उपस्थित राहू शकले नाही, याबद्दलची माहितीही यासोबत समोर आली.

रियाच्या लग्नपत्रिकेत लिहीले होते की, “१४ ऑगस्ट २०२१ रोजी रिया आणि करण बूलानीचा लग्न सोहळा आहे. पण कोरोना महामारीच्या नियमांचे पालन करुन हा लग्नसोहळा कमी लोकांच्या उपस्थितीत पार पडेल. तुम्ही सर्वजण आमच्या खूप जवळचे आहात आणि आम्हाला या आनंदाच्या क्षणी तुमच्या सर्वांची खूप आठवण येईल. तसेच रिया आणि करण नविन आयुष्याची सुरुवात करता आहेत. त्यांना तुमच्या आशिर्वादाची गरज आहे.”

तसेच पुढे लिहीले आहे की, “सर्व परिस्थिती सुरळीत झाली की आपण सर्वजण लवकरच भेटू आणि अगदी धुमधडाक्यात रिसेप्शनचे नियोजन करु.” रिया आणि करणच्या लग्न सोहळ्यात जान्हवी कपूर, खूशी कपूर, बोनी कपूर,अंशुला कपूर उपस्थित होते. दरम्यान, त्यांच्या रिसेप्शनमध्ये रिया आणि अनिल कपूर एकत्र डांस करताना दिसले‌ होते. सोनम कपूरच्या ‘अभी तो पार्टी शुरू हुई है’ या गाण्यावर ठेका धरल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-आलिया भट्टला किस करताना दिसला रणबीर कपूर, ‘त्या’ फोटोमध्ये पाहायला मिळाली दोघांची रोमॅंटिक केमिस्ट्री

-‘सुपर डान्सर ४’च्या मंचावर शिल्पा शेट्टीचे दणक्यात स्वागत; सगळ्यांचे प्रेम पाहून अभिनेत्रीला अश्रू झाले अनावर

-Bigg Boss OTT : शमिता शेट्टी अन् राकेश बापट यांच्यामध्ये वादावादी, अभिनेत्रीने दिला डायपर घालण्याचा सल्ला

हे देखील वाचा