आशिया चषक 2022 सुरू झाला आहे आणि बहुप्रतिक्षित सामन्यांपैकी एक भारत विरुद्ध पाकिस्तान सामना आहे. दोन्ही देशांचे प्रेक्षक या सामन्याची वाट पाहत असून आज हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. या रोमांचकारी सामन्याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. अशातच मनोरंजन जगतातून एक धक्कादायक प्रतिक्रिया समोर आली आहे.
केआरके म्हणजेच कमाल रशीद खान अनेकदा आपल्या वक्तव्यांमुळे आणि ट्विटमुळे चर्चेत असतो. मात्र यावेळी त्याने चित्रपटाबाबत नव्हे तर बीसीसीआयबाबत ट्विट केले आहे. त्याने ट्विट केले की, “बीसीसीआय ही एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे आणि काही राजकारणी ती चालवत आहेत. ही कंपनी आयकरही भरत नाही. म्हणूनच मी #BCCI संघाला भारतीय संघ म्हणू शकत नाही.”
हेही वाचा – विजयने लायगरपूर्वी दिले फक्त चार ब्लॉकबस्टर चित्रपट, फ्लॉप चित्रपटाची यादी एकदा पाहा
विजय सेतुपतिचा भाव वाढला, शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटासाठी घेतले ‘इतके’ मानधन
लारा दत्ताने शेअर केला नो मेकअप फोटो, अभिनेत्रीची अवस्था पाहून व्हाल थक्क