Saturday, June 29, 2024

बॉलिवूडच्या या चित्रपटांवर पडला नाही बॉयकॉटचा प्रभाव, बॉक्स ऑफिसवर केली कोट्यावधीची कमाई

सध्या बॉलिवूडमध्ये खराब परिस्थिती चालू आहे. जानेवारीपासून ते आतापर्यंत 2022चे वर्ष बॉलिवूडसाठी खराब गेले आहे. ‘लालसिंग चड्ढा’, ‘रक्षाबंधन’, ‘शमशेरा’सारखे ब्लॉकबास्टर चित्रपट बॉक्स ऑफिसवर लागोपाठ आदळले आहेत. अजय देवगन, अक्षय कुमार, आणि आमिर खानसारखे दिग्गज कलाकार देखिल यावर्षी काहीच धमाल नाही करु शकले. या चित्रपटाच्या फ्लॉप होण्यामागचे कारण बॉयकॉटला मानले जात आहे. काही दिवसापासून बॉलिवूडवर बहिष्कार केला जात आहे. आज आपण अशा चित्रपटाविषयी जाणून घेणार आहोत जे प्रदर्शित होण्याच्या आधी त्या चित्रपटांचा खूप जास्त विरोध केला होता मात्र, या चित्रपटांनी बॉक्सऑफिसवर चांगलीच धमाल केली होती.

माइ नेम इज खान
बॉलिवूडचे किंग खान अर्थातच शाहरुख खान काही वर्षापूर्वी  सगळ्यात आधी बॉयकॉटचा सामना करावा लागला होता. साल 2010 मध्ये चित्रपट ‘माइ नेम इज खान’ वेळी चित्रपटाला जोरदार विरोधाचा सामोरे जावे लगले होते. कारण शाहरुख खान आयपीएलमध्ये पाकिस्तान खिलाडीला घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे प्रेक्षक नाराज झाले होते. मात्र चित्रपटावर याचा काहीच याचा काहीच प्रभाव पडला नाही. या चित्रपटाने दुनियाभरात एकूण 223 कोटाची कमाई केली होती.

पीके
साल 2014 मध्ये प्रदर्शित झालेला आमिर खानचा चित्रपट ‘पीके’ या चित्रपचामध्ये भारतातील धार्मिकावर लोकांना कसे फसवले जाते हे दाखवले होते त्यामुळे हिंदू संगठनाने लोकांच्या भावना दुखवल्या आहेत असा आरोप केला होता. चित्रपटाच्या काही सीनवर ईसाई आणि मुस्लिम समाजाने देखिल विरोधाचे पाउल उचलले होते. हे सगळे होउनही चित्रपटावर काहीच प्रभाव पडला नाही आणि चित्रपट जोरदार गाजला. या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर 340 कोटी पेक्षाही जास्त गल्ला जमवला होता. वल्डवाइडने 854 कोटी रुपयाचे कलेक्शन केले होते.

दंगल
आमिर खानचा दंगल चित्रपट 2016 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटावरही जोरदार विरोध केला होता. आमिर खानने एका मुलाखतीत सांगितले होते की, माझी बायको किरण हीला भारतामध्ये राहायला खूप भिती वाटते. आमिर खानच्या या वक्तव्यामुळे दंगल चित्रपटाला जोरदार विरोध केला होता मात्र, याचा चित्रपटावर काहीच प्रभाव पडला नाही. या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर आपली वेगळीच छाप सोडली होती आणि 384 कोटीचा गल्ला जमवला होता. दुनियाभरात या चित्रपटाने 2000 कोटीपेक्षाही जास्त कलेक्शन केले होते या चित्रपटाने नविन रेकॉर्ड स्थापित केला होता.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
‘ब्रह्मास्त्र’ रिलीज होण्यापूर्वी रणबीर आणि आलिया भट्टचा निषेध, महाकाल मंदिरात जाण्यापासून रोखले
‘लायगर’ फ्लाॅप झाल्याने विजय देवराकोंडा अडचणीत; ‘या’ चित्रपटाची रिलीज तारीख ढकलणार पुढे
‘ब्रम्हास्त्र’ने रिलीज होण्याआधीच तोडला ‘भुलभूलैया २’चा रेकॉर्ड, एडवांस बुकिंगने केली ‘एवढ्या’ कोटींची कमाई

हे देखील वाचा