Tuesday, July 9, 2024

खान अभिनेता वादाच्या भोवऱ्यात; ऑनलाइन बेटिंग ॲप प्रकरणी FIR दाखल? एकदा वाचा

महादेव बेटिंग अॅप प्रकरण गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असून या प्रकरणात अनेक कलाकारांची नावे समोर आली आहेत. आता ‘स्टाईल’ चित्रपटात काम केलेला अभिनेता साहिल खानचे नावही या प्रकरणाशी जोडले गेले आहे. त्याच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी 7 नोव्हेंबर रोजी महादेव बुक अॅपचे प्रवर्तक सौरभ चंद्राकर, रवी उप्पल आणि शुभ सोनी यांच्यासह 31 जणांविरुद्ध फसवणूक आणि जुगारच्या कलमातंर्गत मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणात 31 जणांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. या एफआयआरमध्ये अभिनेता साहिल खानचेही (Sahil Khan) नाव आहे. या प्रकरणात 31 जणांमध्ये त्याचे नाव 26 व्या क्रमांकावर आहे. महादेववर ऑनलाइन बेटिंग अॅपशी संबंधित आणखी एक बेटिंग अॅप चालवल्याचा आरोप आहे. माटुंग्यातील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बनकर यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुगार कायदा, आयटी कायदा अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. म्हणजेच साहिल खानवर केवळ प्रमोशनचाच आरोप नाही तर अॅप ऑपरेट करून प्रचंड नफा कमावल्याचाही आरोप आहे.

अभिनेता साहिल खानवर आरोप आहे की, तो आपल्या प्रभावाने सेलिब्रिटींना बोलावून पार्ट्या आयोजित करत असे. आॅप ऑपरेटर म्हणून अभिनेत्याच्या विरोधात एफआयआर नोंदवण्यात आल्याचे या अहवालातून समोर आले आहे. त्यामुळे भविष्यात त्यांच्या अडचणी वाढू शकतात. खिलाडी नावाचे बेटिंग अॅप चालवल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याआधी साहिल खान दुबईमध्ये ऑनलाइन बेटिंग अॅपच्या पार्टीच्या व्हिडिओमध्ये दिसला होता. आता त्याच्यावर काय कारवाई होते हे पाहायचे आहे.

बनकर यांनी न्यायालयात तक्रार दाखल केली होती, त्यानंतर न्यायालयाने माटुंगा पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. अॅपच्या माध्यमातून लोकांची 15 हजार कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा दावा बनकर यांनी केला आहे. या अॅपच्या माध्यमातून खेळाडू फसवणुकीच्या कारवायांमध्ये गुंतले होते. स्टाईल चित्रपटाव्यतिरिक्त, अभिनेता अलादीन आणि डबल क्रॉस सारख्या चित्रपटांचा देखील भाग होता. (FIR filed against Sahil Khan in Mahadev Betting App case)

आधिक वाचा-
ऋतिक- सबाने रोशन कुटुंबासोबत साजरी केली दिवाळी, एकदा पाहाच लव्हबर्ड्सचे फोटो
Children’s Day 2022: ‘तारे जमीन पर’ ते ‘मासूम’पर्यंत, ‘ही’ फिल्मी गाणी ऐकत बनवा तुमचा बालदिन खास

हे देखील वाचा