Monday, July 15, 2024

Yo Yo Honey Singh | शोदरम्यान अज्ञातांनी केला हनी सिंगवर हल्ला, रॅपरने दाखल केली एफआयआर

प्रसिद्ध रॅपर आणि गायक हनी सिंग (Honey Singh) आणि त्याच्या सहकारी कलाकारांसोबत गैरवर्तन झाल्याची घटना समोर आली आहे. हे प्रकरण दक्षिण दिल्लीतील साउथ एक्स भागातील आहे. २६ मार्चला स्कॉल क्लबमध्ये हनी सिंगचा शो होता. हनी सिंग त्याच्या टीमसोबत एक शो करत होता. यादरम्यान ५ ते ६ लोकांनी त्याच्यासोबत गैरवर्तन केले, त्यानंतर त्यांनी शो मध्येच थांबवला.

पोलीस करतायेत तपास
हनी सिंगने या प्रकरणी दिल्लीतील हौज खास पोलीस ठाण्यात अज्ञात लोकांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. पोलिसांनी मारहाणीच्या कलमान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. क्लबमध्ये लावण्यात आलेले सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर, पोलीस आता हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. (fir lodged by honey singh after manhandled at a south delhi club)

जबरदस्ती स्टेजवर चढले लोक
एफआयआरनुसार, हनी सिंग २६ आणि २७ मार्चच्या मध्यरात्री क्लबमध्ये परफॉर्म करण्यासाठी गेला होता. तेव्हाच कार्यक्रमादरम्यान काही लोक जबरदस्तीने स्टेजवर चढले आणि त्यांनी कलाकारांसोबत धक्काबुक्की आणि मारहाण सुरू केली. 

लोकांनी केली धक्काबुक्की आणि दिल्या धमक्या
एफआयआरनुसार, ५ ते ६ अज्ञात लोकांनी शोमध्ये गैरवर्तन केले आणि अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. त्यांनी गर्दीमध्ये बिअरच्या बाटल्या दाखवल्या आणि कलाकारांना धक्का देण्यास सुरुवात केली. यानंतर चेक्स शर्ट घातलेल्या एका व्यक्तीने माझा (हनी सिंग) हात पकडला आणि ओढण्यास सुरुवात केली. सुरुवातीला मी दुर्लक्ष करत होतो, पण ती व्यक्ती मला सतत धमक्या देत होती. त्याच्याकडे शस्त्रही होते, जे मी पाहिले. त्याचवेळी लाल शर्ट घातलेला आणखी एक व्यक्ती व्हिडिओ बनवत होता आणि तो म्हणाला, “पळवलं हनी सिंगला.”

मध्येच बंद करावा लागला शो
तक्रारीत म्हटले आहे की, हनी सिंगसह सर्व कलाकारांनी स्टेज खाली केला. परिस्थिती पाहून हनी सिंगला कार्यक्रम अर्धवट सोडावा लागला. पोलिसांनी जाणूनबुजून दुखापत करणे, गुन्हेगारी धमकी देणे आणि इतर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. सध्या हनी सिंगने या प्रकरणी कोणतेही वक्तव्य जारी केलेले नाही.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा