Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

मुनमुन दत्ताच्या अडचणीत वाढ! जातीयवादी शब्दाचा वापर केल्यामुळे ‘बबिता जी’विरुद्ध एफआयआर दाखल

टीव्हीवरील सर्वात प्रसिद्ध मालिकांपैकी एक म्हणून ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेला ओळखले जाते. या मालिकेत बबिता जी ही भूमिका साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता मागील काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. काही दिवसांपूर्वी तिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला होता, ज्यामध्ये तिने दलित समाजाबद्दल जातीयवादी शब्द वापरला होता. आता असे वृत्त येत आहे की, तिच्याविरुद्ध मुंबईत एफआयआर दाखल झाली आहे. हा व्हिडिओ पाहून लोकांनी तिला जोरदार ट्रोल केले होते. तसेच तिला अटक करण्याचीही मागणी केली गेली होती.

एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, “कम्युनिटीचे नेता आणि एका राजकीय पक्षाचे कार्यकर्ता नरेश बोहित यांनी गोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये १२ मे रोजी दिलेल्या तक्रारीच्या आधारे मुनमुन दत्ताविरुद्ध २६ मे रोजी गुन्हा दाखल केला.” त्यांनी असे म्हटले की, अभिनेत्री अंबोली पोलीस स्टेशनच्या भागात राहते. त्यामुळे तक्रार त्या पोलीस स्टेशनला पाठवली आहे. तपासानंतर बुधवारी (२६ मे) गुन्हा दाखल केला.

अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, “अभिनेत्रीविरोधात भारतीय दंड संहिता (आयपीसी) कलम २९५ (अ) (कोणत्याही धर्माचा किंवा धार्मिक श्रद्धेचा अपमान करुन कोणत्याही वर्गाच्या धार्मिक भावना दुखावण्यासाठी हेतूपुरस्सर आणि द्वेषबुद्धीने केलेले कृत्य) आणि अनुसूचित जाती व जमातीचे ऍट्रॉसिटी प्रतिबंधक कायदा १९८९ च्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

मुनमुन दत्ताने हा व्हिडिओ आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून १० मे रोजी शेअर केला होता. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तिला नेटकऱ्यांनी चांगलेच झापले होते. यानंतर तिने हा व्हिडिओ डिलीट केला होता आणि माफी मागितली होती.

अभिनेत्रीने लिहिले होते की, “मला जाती, धर्म किंवा लिंगानुसार प्रत्येक व्यक्तीचा अत्यंत आदर आहे आणि मी समाज किंवा राष्ट्रासाठी त्यांच्या अपार योगदानाचा स्वीकार करते. मी प्रामाणिकपणे प्रत्येक व्यक्तीची क्षमा मागत आहे आणि मला त्याच्याबद्दल खेद आहे.”

मुनमुन दत्ता या व्हिडिओमध्ये तिच्या मेकअपबद्दल बोलत होती. या व्हिडिओमध्ये ती म्हणाली होती की, “माझ्याकडे लिप टिंट आहे, जो मी माझ्या चेहऱ्यावर ब्लशसारखा लावला आहे, कारण लवकरच मी यूट्यूबवर पदार्पण करणार आहे.” याच व्हिडिओमध्ये तिने जातीवादक शब्द वापरला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

हे देखील वाचा