Saturday, April 19, 2025
Home साऊथ सिनेमा श्वास रोखून धरा! रजनीकांत यांच्या ‘अन्नाथे’ चित्रपटाचा फर्स्ट लूक आला समोर; ‘या’ दिवशी होणार रिलीझ

श्वास रोखून धरा! रजनीकांत यांच्या ‘अन्नाथे’ चित्रपटाचा फर्स्ट लूक आला समोर; ‘या’ दिवशी होणार रिलीझ

‘क्यों हिला डाला ना’ हा डायलॉग ऐकल्यानंतर आपल्या सर्वांच्या मुखात आपसुकच ‘थलायवा’ रजनीकांत यांचे नाव येते. रजनीकांत यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ते आता पुन्हा एकदा सिनेमाचं मैदान गाजवण्यासाठी सज्ज झाले आहेत. रजनीकांत हे ‘अन्नाथे’  या चित्रपटातून धमाकेदार पुनरागमन करत आहेत. या चित्रपटाची चाहत्यांना खूपच उत्सुकता लागली आहे. चाहत्यांची ही उत्सुकता वाढवण्यासाठी निर्मात्यांनी नुकतेच याचा फर्स्ट लूक पोस्टर प्रदर्शित केला आहे. पोस्टरमध्ये रजनीकांत एका नवीन लूकमध्ये दिसत आहेत.

‘अन्नाथे’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित
सन पिक्चर्सने ट्विटरवर ‘अन्नाथे’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित केले आहे. या पोस्टरमध्ये रजनीकांत हे पांढऱ्या रंगाचा शर्ट परिधान करून स्मितहास्य करताना दिसत आहेत. त्यांनी डोळ्यांवर चष्माही लावला आहे. तसेच ते आकाशाकडे पाहत आहेत. रजनीकांत यांचा हा लूक खूपच स्टायलिश दिसत आहे. चाहतेही त्यांच्या या लूकची प्रशंसा करत आहेत. (First Look of Superstar Rajinikanths Film Annaatthe Out Now)

‘या’ दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट
रजनीकांत यांचा ‘अन्नाथे’ हा चित्रपट याचवर्षी ४ नोव्हेंबरला म्हणजेच दिवाळीला प्रदर्शित होणार आहे. मागील बऱ्याच काळापासून हा चित्रपट तयार झाला आहे. मात्र, देशभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली होती.

‘हे’ कलाकारही झळकणार
रजनीकांत यांच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन कलानिधी मारन यांनी केले आहे. या चित्रपटात रजनीकांत यांच्याव्यतिरिक्त मीना, खुशबू, नयनतारा, कीर्ति सुरेश, जॅकी श्रॉफ, जगपती बाबू, प्रकाश राज, सूरी आणि सतीशसह अनेक कलाकारांचा समावेश आहे.’

‘महान’ चित्रपटाचे फर्स्ट लूक पोस्टरही झाला प्रदर्शित
तसेच दुसरीकडे ध्रुव विक्रमच्या ‘महान’ या चित्रपटाचे फर्स्ट लूक पोस्टरही प्रदर्शित झाले आहे. कार्तिक सुब्बाराज दिग्दर्शित या चित्रपटात ध्रुव दादाची भूमिका साकारत आहे. चित्रपटाच्या पोस्टरमध्येही ध्रुव दिसत आहे. चित्रपटाची शूटिंग काही आठवड्यांपूर्वी पूर्ण झाली होती. सध्या हा चित्रपट पोस्ट- प्रोडक्शनच्या टप्प्यात आहे. निर्माते लवकरच चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करणार आहेत.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-क्रिकेटमधील ‘दादा’ गाजवणार सिनेमाचं मैदान; झालीय सौरव गांगुलीच्या बायोपिकची घोषणा

-‘घर की मुर्गी दाल बराबर!’ माधुरी दीक्षितने स्वतः लाच का दिली असेल ही उपमा?

-‘बिग बॉस १५’च्या पहिल्या स्पर्धकाचे नाव आले समोर, टीव्हीची ‘ही’ लोकप्रिय अभिनेत्री घेणार सहभाग

हे देखील वाचा