Thursday, March 13, 2025
Home बॉलीवूड स्वतःला फिट ठेवण्यासाठी जान्हवी घेतेय मोठी मेहनत, व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल फिदा

स्वतःला फिट ठेवण्यासाठी जान्हवी घेतेय मोठी मेहनत, व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल फिदा

अभिनेत्री जान्हवी कपूर कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते. आपल्या चाहत्यांसाठी स्वत:च्या आयुष्यातील अनेक गोष्टी सोशल मीडियामार्फत शेअर करते. तसेच ती तिच्या फिटनेससाठी देखील नेहमी जागरुक दिसते. सोशल मीडियावर ती तिच्या वर्कआऊटचे देखील फोटो शेअर करते. अशात सध्या तिचा जिममधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, जान्हवी वेगनेगळ्या पद्धतीचे व्यायाम करताना दिसत आहे. तिने यामध्ये एक गुलाबी रंगाची पँट घातली आहे. तसेच पांढऱ्या रंगाचा एक टॉप घातला आहे. तिचा हा व्हिडिओ फिल्मफेअर या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडिओ पोस्ट करत “जान्हवी ही एक फिटनेससाठी उत्साही मुलगी आहे आणि हा व्हिडिओ त्याचा पुरावा आहे,” असे लिहिले आहे. (Fitness freak janhavi kapoor video went viral on social media)

कोरोना काळात सर्व काही बंद असल्याने अनेक कलाकारांनी स्वतःला फिट ठेवण्यासाठी घरामध्येच एक छोटी जिम सुरू केली होती. जान्हवीने देखील असेच केले असावे आणि व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ तिच्या घरामधीलच असावा, असे अनेकांना वाटत आहे.

जान्हवी नेहमीच तिच्या फिटनेसमुळे चर्चेत असते. जिम करून तिने स्वत:ची फिगर अगदी मेंटेन ठेवली आहे. नुकतेच तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर नायका ब्रँडच्या जाहिरातीचे काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले होते. यामध्ये तिने चंदेरी रंगाचा एक घागरा घातलेला आहे. यामध्ये तिने सिंपल लूक ठेवला आहे. तसेच हेवी आय मेकअप केला आहे. तिच्या या लूकवर देखील अनेक चाहते फिदा झाले आहेत. अनेकांनी तिला या फोटोंवर हार्ट ईमोजी देखील पाठवले आहेत.

जान्हवीच्या अभिनयाबद्दल बोलायचे झाल्यास, सन २०१८ मध्ये तिने ‘धडक’ या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिने ‘घोस्ट स्टोरीज’, ‘रूही’ या चित्रपटांमध्ये काम केले. तसेच लवकरच ती ‘दोस्ताना २’ आणि ‘गुडलक जेरी’ या चित्रपटांमधून पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘तुला उर्फीचा आजार चढलाय काय?’ विचित्र ड्रेसमुळे काजोल आली ट्रोलर्सच्या निशाण्यावर

-मोठा भाऊ घरी येण्याच्या बातमीने अबराम खान झाला भलताच खुश, व्हिडिओ होतोय जोरदार व्हायरल

-‘अशी’ होती जामीन मंजूर झाल्यानंतर आर्यनची पहिली प्रतिक्रिया, वाचा कर्मचाऱ्यांसह कैद्यांना काय म्हणाला?

हे देखील वाचा