Sunday, June 8, 2025
Home बॉलीवूड बिग बॉसच्या घरात शमिता शेट्टीच्या पुनरागमनाने प्रेक्षकांमध्ये पसरली नाराजी; युजर्स म्हणतायेत, ‘टीआरपीसाठी…’

बिग बॉसच्या घरात शमिता शेट्टीच्या पुनरागमनाने प्रेक्षकांमध्ये पसरली नाराजी; युजर्स म्हणतायेत, ‘टीआरपीसाठी…’

‘बिग बॉस’ १५चे नवे पर्व सुरू झाले आहे. यावेळी शोचे सूत्रसंचालन सलमान खान करणार नसून दिग्दर्शक करण जोहर करत आहे. ‘बिग बॉस’चे हे पर्व प्रथम ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीझ झाले आहे. आतापर्यंत नेहा भसीन, जीशान खान, अक्षरा सिंग आणि दिव्या अग्रवाल यांच्यासह अनेक स्पर्धकांनी शोमध्ये प्रवेश केला आहे. बिग बॉसच्या प्रत्येक पर्वाला वादग्रस्त शो म्हटले जाते. ‘बिग बॉस’चे पुढील भाग पाहण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. या भागात नव्या  स्पर्धकाच्या एंट्रीमुळे प्रेक्षकांचे लक्ष वेधल आहे.

शोमध्ये शमिता शेट्टीचे पुनरागमन पाहून चाहते नाराज
खरं तर, राज कुंद्राच्या वादादरम्यान, ‘बिग बॉस १५’च्या निर्मात्यांनी शिल्पा शेट्टीची बहीण अभिनेत्री शमिता शेट्टीला ओटीटी शोमध्ये स्पर्धक म्हणून निवडले आहे. शमिता यापूर्वीही बिग बॉसमध्ये स्पर्धक म्हणून दिसली होती. शमिताने या स्पर्धेत स्पर्धक म्हणून पुनरागमन केले आहे. या शोमध्ये शमिताला पाहून चाहते नाराज झाले आहेत.

बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदाच स्पर्धक म्हणून दिली डबल एंन्ट्री
शोमध्ये अनेक जुन्या कलाकारांनीही एंन्ट्री केलेली आपण पाहिले आहे. मग ती राखी सावंत असो किंवा विकास गुप्ता. परंतु या शोमध्ये आतापर्यंत आलेले सर्व जुने स्पर्धक, शोमध्ये काही दिवस पाहुणे म्हणून आले होते. बिग बॉसच्या इतिहासात ही पहिलीच वेळ आहे की, माजी स्पर्धक शमिता शेट्टीला शोमध्ये डबल एंन्ट्री देण्यात आली आहे.

टीआरपी वाढवण्यासाठी नियम मोडले?
शमितासारख्या स्पर्धकाला डबल एंन्ट्री टीआरपी वाढवण्यासाठी देण्यात येत असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. तसेच या गोष्टीसंदर्भात विविध प्रश्न प्रेक्षक उपस्थित करत आहेत. शमिताला बिग बॉसच्या घरात पाहिल्यानंतर प्रेक्षक सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘महाराष्ट्राचा बहुरंगी, बहुढंगी तमाशा’, सोनाली कुलकर्णीच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

-‘अब क्या कहे क्या नाम ले…’, म्हणत अंकिता लोखंडेने लावले जोरदार ठुमके; डान्स व्हिडिओ व्हायरल

-व्हिडिओ: टायगर श्रॉफने गायलेल्या पहिल्या हिंदी गाण्याचा दमदार टिझर प्रदर्शित

हे देखील वाचा