Monday, July 1, 2024

दुःखद.! ‘बिग बॉस’चे माजी स्पर्धक स्वामी ओम यांचे निधन

नवी दिल्ली। प्रसिद्ध टीव्ही शो बिग बॉसचे माजी स्पर्धक स्वामी ओम यांचे आज (३ फेब्रुवारी) निधन झाले आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, स्वामी मागील काही दिवसांपासून आजारपणाने ग्रस्त होते. त्याचबरोबर ते तीन महिन्यांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. असे असले तरीही ते यातून बरे झाले होते. परंतु कमकुवतपणामुळे त्यांना चालण्यास त्रास होत होता.

स्वामी ओम यांचे मित्र मुकेश जैनचा मुलगा अर्जुन याने माध्यमांशी बोलताना म्हटले की, ‘त्यांना (स्वामी) पॅरालिसिस झाला होता. त्यानंतर त्यांची तब्येत आणखीच बिघडली होती. त्यांचे अर्धे शरीर पॅरालिसिसच्या तावडीत सापडले होते.’

असे म्हटले जात आहे की, त्यांचे अंतिम संस्कार आज निगम बोध घाट, दिल्ली येथे करण्यात येणार आहे.

खरं तर स्वामी ओम यांचे वादविवादांशी घट्ट नाते होते. त्यांनी एकदा ‘उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची नेमणूक करताना मुख्य न्यायाधीश ऑफ इंडियाकडून (सीजेआय) शिफारस का घेतली जाते’, असा सवाल करून त्यांनी एकदा सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. यावर सीजेआय खेहर आणि न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने याला प्रसिद्धी स्टंट सांगितले होते. असे असले तरीही स्वामी ओम यांनी याबाबत स्पष्टपणे नकार दिला होता. त्यांनी म्हटले होते, ‘मला बिग बॉसमधून आधीच खूप प्रसिद्धी मिळाली आहे.’

या प्रकरणात त्यांना १० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. तरीही त्यानंतर दंडाची रक्कम ५ लाख रुपये करण्यात आली होती. सोबतच त्यांना तो दंड ८ आठवड्यांच्या आत भरण्यास सांगितले होते.

हे देखील वाचा