Saturday, June 29, 2024

‘तुच्छ लेखणारे…’ म्हणत किसी का भाई किसी की जानमधील गाण्यावर माजी क्रिकेटपटूची नाराजी

सध्या सलमान खान त्याच्या लवकरच प्रदर्शित होणाऱ्या ‘किसी का भाई किसी जान’ या सिनेमामुळे अमाप गाजत आहे. त्याचा हा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्याआधी सिनेमातील गाण्यांनी तुफान धुमाकूळ घातला आहे. आतापर्यंत सिनेमातील तीन गाणी प्रदर्शित झाली असून, तिघं गाण्यांना प्रेक्षकांनी जोरदार प्रतिसाद दिला आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमातील ‘यंतम्मा’ गाणे प्रदर्शित केले गेले. गाण्याला तर तुफान प्रतिसाद मिळत असून, गाण्याचे शब्द, संगीत, डान्स सर्वच गोष्टी गाजत आहे. मात्र आता या सर्वांमध्ये गाण्याला घेऊन एक वाद निर्माण झाला आहे.

एका माजी क्रिकेटपटूने या गाण्याच्या बाबतीत पोस्ट करत नाराजी व्यक्त केली आहे. माजी क्रिकेटर असणाऱ्या लक्ष्मण शिवरामकृष्णन सोशल मेडियावरून पोस्ट शेअर करत दाक्षिणात्य संस्कृतीची खिल्ली या गाण्यातून उडवल्याचे सांगितले आहे. त्यांनी ट्विटरवर ट्विट करत त्यांची भूमिका मंडळी.

क्रिकेटर लक्ष्मण शिवरामकृष्णन यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिले, “हे खूपच विचित्र आणि हास्यास्पद असून, आपल्या दाक्षिणात्य संस्कृतीला तुच्छ लेखणारे आहे. ही लुंगी नाही, याला धोतर म्हणतात, आपल्या पारंपरिक पोषाखाची या गाण्यात खिल्ली उडवण्यात आली आहे.” सोबतच त्यांनी ट्विटमध्ये लुंगी आणि धोती यांचे फोटो पोस्ट करत त्यातील फरक देखील सांगितलं आहे.

लक्ष्मण शिवरामकृष्णन यांच्या या ट्विटला अनेकांनी समर्थन देत गाण्याला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. दरम्यान या गाण्याची लोकांवर तुफान क्रेझ असून, गाण्याला आतापर्यंत मिलिनियन व्ह्यूज मिळाले आहे. ‘यंतम्मा’ गाण्याला विशाल दादलानी आणि पायल देव यांनी आवाज दिला आहे. या गाण्यात सलमान आणि व्यंकटेशसह दाक्षिणात्य अभिनेता राम चरणही कॅमिओ करताना दिसत आहे. सलमानचा ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट २१ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अण्णांचा हटके अंदाज! नागराज मंजुळने वाजवली हलगी अन् आकाश-सायलीने केला भन्नाट डान्स, व्हिडिओ व्हायरल

आपल्या विवादित आणि मुक्त वक्तव्यांमुळे सतत चर्चित असणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीला ओळखले का?

हे देखील वाचा