Saturday, July 6, 2024

‘वाटतंय की हा देश आता वेड्यांच्या…’, पठाण चित्रपटाची वाढती गर्दी पाहून माजी न्यायधीश संतापले

शाहरुख खान स्टारर प्रदर्शनापूर्वीच रेकार्ड ब्रेक करणाऱ्या पठाण चित्रपटाने बक्सऑफिसवर धमाका केला आहे. प्रदर्शनाच्या दोनच दिवसात चित्रपटाने 100 कोटींपेक्षा जास्त गल्ला जमवला आहे. एकीकडे वाद आणि दुसरीकडे चाहत्यांप्रती पठाणसाठी प्रमे पाहुन अनेकांना आश्चर्याचा मोठा धक्का बसला आहे. जिकडे तिकडे पठाणमय वातावरण पाहायाला मिळत असून सर्वत्र चित्रपटाचे कौतुक होत आहे, तर एकीकडे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायधीश मार्कंडेय काटजू यांनी देखिल पठाण दोखिल पठाणच्या वादात उडी घेतली आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत नेटकऱ्यांना लक्ष्य केलं आहे.

शाहरुख खान (Shahrukh Khan) स्टारर पठाण (Patahan) चित्रपटाने प्रदर्शानवपूर्वीच प्रेक्षकांवर भुरळ घातली होती आणि प्रदर्शानंतर तर चाहत्यानी थिएटबाहेर राडाच घातला. दोनच दिवसात पठणने बॉक्सऑफिसवर 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. पठाणची हवा सुरु असताना न्यायालयाचे न्याधीश मार्कंडेय काटजू (markandey katju) यांनी पठाण विरोधात पोस्ट करुन कौतुक करणाऱ्या चाहत्यांना आणि कलाकारांवर निशाना साधला आहे सोशल मीडियाद्वारे टीकास्त्र सुरु केले होते मात्र, पठाण प्रेमिंनी त्यांनाच प्रतिउत्तर देत सल्ले दिले आहेत. त्याशिवया त्यांचे मिम्स बनवून तुफान व्हायरल केले जात असून म्हटलं आहे की, तुम्ही निर्माण केलेल्या वादामुळेच पठाणची जाहिरातच झाली आहे.

माजी न्यायधीश हे निवृत्त न्यायधीश असून त्यांना निवृत्ती मिळाल्या नंतर त्यांनी वाद निर्माण होणाऱ्या वक्तव्याचा सपाटाच लावला होता. आता पुन्हा एकदा त्यांनी पठाण विरोधात प्रतिक्रिय देत वादामध्ये उडी घेतली अहे. त्यांनी ट्वीट शेअर करत लिहिले की, “पठाण चित्रपट पाहाण्यासाठी चाहत्यांमध्ये जी गर्दी पाहायला मिळते ती पाहूण असं वाटतंय की, हा देश आता वेड्यांच्या रुग्णालयात दाखल होणार का? (पागल खाना)”

त्याशिवाय काटजू यांनी दोन दिवसांपूरर्वी शेअर केलेल्या ट्वीटमध्ये देखिल लिहिले होते की, “पठाण चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद पाहूण असं वाटत आहे की, देशातली मुर्खांची संख्या वाढून 90 ते 95 टक्क्यांच्या घरात पोहोचली आहे. ” काटजूंच्या या पोस्टनंतर शाहरुखच्या चाहत्यांनी देखिल त्यांना जाम ट्रोल कारायला सुरुवात केली. त्यांच्या पोस्टखाली चाहत्यानी नको त्या कमेंट करत त्यांना सल्ले देण्यास सुरुवात केली आहे.

एका चाहत्याने लिहिले की, “तुम्ही म्हणताय तसं होतंय खरं, पण मुद्दे या चित्रपटाने लपवले आहेत.” तर दुसऱ्या जुयरने लिहिल की, “पठाणचा जर अशीच प्रतिक्रिय मिळाली तर तुम्ही आणि मी सोडून बाकी सगळे वेडी होतील.” तर एका अन्य युजरने लिहिले की, “आधी बायकॉटची धमकी देणारे वेडे झाले होते आणि आता चित्रपट पाहायला जाणारे वेडे झालेत.” असं म्हणत दोन्ही बाजूचे चाहते त्यांना ट्रोल करुन त्यांचे मीम्स सोशल मीडियावर व्हायरल करत आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
याला काय अर्थ! केएल राहुल आणि अथियाच्या लग्नाला मिळणाऱ्या भेटवस्तू फक्त अफवाच, मोठा खुलासा
‘राजकारणापासून लांब राहा नाही तर…’ पठाण चित्रपाटाचं कौतुक करणाऱ्या बॉलिवूडवर कंगनाने व्यक्त केला संताप

हे देखील वाचा