Sunday, October 6, 2024
Home बॉलीवूड शिल्पा शेट्टी अन् तिची आई सुनंदाला होणार अटक? करोडो रुपयांच्या फसवणुकीचा दोघींवर आरोप

शिल्पा शेट्टी अन् तिची आई सुनंदाला होणार अटक? करोडो रुपयांच्या फसवणुकीचा दोघींवर आरोप

सध्या शिल्पा शेट्टी आणि तिच्या कुटुंबाचे ग्रह काही चांगले दिसत नाहीयेत. एकामागून एक संकट शिल्पावर आघात करत आहेत. आता अशी परिस्थिती आहे की, शिल्पा चहुबाजूंनी संकटांमध्ये अडकली आहे. मागच्या महिन्यात शिल्पाच्या नवऱ्याला राज कुंद्राला पॉर्नोग्राफी प्रकरणात मुंबई पोलिसांनी अटक केली होती. राज कुंद्रा आता न्यायालयीन कोठडीत असून, त्याच्या विरोधात अनेक पुरावे सापडत असल्याने राज कुंद्रा आणि पर्यायाने शिल्पा शेट्टी यांच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसत आहे.

राज कुंद्रा संकटातून बाहेर पडत नाही, तोपर्यंत आता शिल्पावर अजून एक संकट ओढवले आहे. शिल्पा शेट्टी आणि तिची आई सुनंदा शेट्टी यांच्यावर आयोसिस वेलनेस सेंटरच्या नावावर अनेक लोकांची करोडो रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. उत्तरप्रदेशमधील लखनऊ येथील हसरतगंज पोलीस ठाण्यात शिल्पा शेट्टी आणि तिच्या आई विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ‘आयोसिस स्लिमिंग स्किन सलून अँड स्पा’ नावाने शिल्पा आणि तिच्या आईने कंपनी सुरू केली आणि या कंपनीची फ्रँचायजी आणि ब्रांच देण्याच्या नावाखाली कोट्यवधी रुपये वसूल केले गेले. मात्र, पुढे काहीच घडले नाही. या कंपनीच्या चेअरमनपदी शिल्पा आणि डायरेक्टरपदी तिची आई सुनंदा शेट्टी आहे. (fraud case on shilpa shetty and sunanda shetty)

लखनऊ येथील ओमेक्स हाइट्स येथे राहणाऱ्या ज्योत्स्ना चौहान यांनी विभूतीखंड पोलीस ठाण्यात, तर रोहित वीर सिंग यांनी हजरतगंज पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या दोन्ही प्रकरणांच्या तपासात शिल्पा आणि तिची आई सुनंदा या सामील असल्याचे समोर आले आहे. हजरतगंज पोलिसांनी शिल्पा आणि तिच्या आईला एक महिन्यापूर्वी चौकशीसाठी समन्स बजावले होते. या प्रकरणात विभूतीखंड पोलीस त्यांनी पाठवलेल्या नोटीसच्या अंमलबजावणीसाठी मुंबईत आले आहेत.

ज्योत्स्ना चौहान यांनी दाखल केलेल्या तक्रारीत सांगितले आहे की, ‘वेलनेस सेंटर उघडण्याच्या नावाखाली आयोसिस कंपनीचे किरण वावा, विनय भसीन, अनिका चतुर्वेदी, इश्राफिल, नवनीत कौर, आशा, पूनम झा आदी लोकांनी दोन वेळा अडीच कोटी रुपये आमच्याकडून घेतले होते. या सेंटरच्या उद्घाटनाला अनेक कलाकार आणि स्वतः शिल्पा शेट्टी उपस्थिती राहील, असे आम्हाला सांगण्यात आले होते. मात्र, उद्घाटनाच्या वेळी असे काहीच घडले नाही.

पोलिसांच्या चौकशीत शिल्पा शेट्टी आणि तिच्या आई विरोधात पुरावे हाती लागल्यास शिल्पा शेट्टीला तिच्या आईसह अटक होण्याची दाट शक्यता आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-इंडियन आयडलच्या ‘या’ स्पर्धकाचे फळफळले नशीब, करण जोहरकडून मिळाली थेट ‘धर्मा’साठी गाणी गाण्याची संधी

-अफेअरच्या चर्चांमध्ये सिद्धार्थ मल्होत्राने कियाराला रस्त्यावरच घेतले उचलुन, पुढे जे झाले…

-रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर घरी बेडरेस्टवर आहे नुसरत भरुचा; ‘या’ कारणामुळे अचानक बिघडली होती तब्येत

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा