Saturday, July 6, 2024

‘फ्रेंड्स: द रियूनियन’ची भारतातही धमाल! काही तासात १० लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज मिळवत बनवला नवा विक्रम

नव्वदच्या दशकातील लोकप्रिय आणि आवडता शो ‘फ्रेंड्स’चा शेवटचा सिझन ‘फ्रेंड्स द रियूनियन’ गुरुवारी (२७ मे) रिलीझ झाला आहे. ‘फ्रेंड्स’च्या नवीन सिझनसाठी चाहते बऱ्याच दिवसांपासून खूप उत्सुक होते. हा शो भारतातही खूप पसंत केला जातो. या शोचा शेवटचा सिझन गुरुवारी झी५ (Zee5) वर रिलीझ करण्यात आला आहे आणि काही तासांतच त्याने भारतात एक नवीन विक्रम स्थापित केला आहे.

‘फ्रेंड्स: द रियुनियन’ ची प्रेक्षक बऱ्याच दिवसांपासून आतुरतेने वाट पाहत होते. झी५ वर याचा प्रीमियर होताच, प्रेक्षकांनी त्याच वेळी याला पाहण्यास सुरुवात केली. इतकेच नाही, तर चाहते सोशल मीडियावर या शोविषयी भावनिक पोस्टही शेअर करू लागले होते. झीच्या डिजिटल व्यवसायाच्या अध्यक्षांनी माहिती दिली की, १० लाखांहून अधिक प्रेक्षकांनी हा शो पाहिला आहे.

झी डिजिटल बिझिनेस एँड प्लॅटफॉर्मचे अध्यक्ष अमित गोयंका म्हणाले की, “फ्रेंड्स: द रियुनियनला झी ५ वर खूप प्रेम मिळाले आहे, हे पाहून आम्हाला आनंद झाला. याला १० लाखांहून अधिक प्रेक्षकांनी पाहिले आहे आणि अद्याप ही मोजणी चालूच आहे. या शोच्या प्रेक्षकांसाठी लाखो स्क्रीनवर हा शो प्ले केल्याबद्दल, आम्हाला अभिमान वाटत आहे.”

एकूण १०४ मिनिटांच्या ‘फ्रेंड्स: द रियुनियन’मध्ये जेनिफर एनिस्टन, कर्टेनी कॉक्स, लिसा कुड्रो, मॅट लेब्लांक, मॅथ्यू पेरी आणि डेव्हिड श्विमर मुख्य भूमिकेत आहेत. यासह जस्टिन बीबर, बीटीएस, जेम्स कॉर्डन, लेडी गागा, टॉम सेलेक, जेम्स मायकल टायलर, मॅगी व्हिलर, रीझ विदरस्पून आणि मलाला यूसुफझई इत्यादी पाहुणे कलाकारांच्या भूमिकेत दिसले आहेत.

‘फ्रेंड्स: द रियुनियन’चा प्रीमियर होताच, सोशल मीडियावर मीम्स आणि भावनिक पोस्ट्सच्या अक्षरशः रांगा लागल्या होत्या. या शोचे चाहते यातील पात्रांसह त्यांच्या मित्रांना आठवून पोस्ट करत आहेत. वीकेंडलाही लाखों प्रेक्षक हा शो पाहतील, अशी अपेक्षा निर्मात्यांना आहे. या शोचा टिझर रिलीज झाल्यापासून याने ट्रेंडमध्ये आपले स्थान बनवले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा