Sunday, October 19, 2025
Home बॉलीवूड बाबो! स्वरक्षाणासाठी बॉलिवूडमधील ‘इतक्या’ कलाकारांनी काढलाय शस्र परवाना, झोपतानाही बंदूक लोड करुन ठेवतात

बाबो! स्वरक्षाणासाठी बॉलिवूडमधील ‘इतक्या’ कलाकारांनी काढलाय शस्र परवाना, झोपतानाही बंदूक लोड करुन ठेवतात

बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. पंजाबी गायक सिद्धू मूसवालाच्या हत्येनंतर सलमान खानला मिळणाऱ्या धमक्यांमुळे तो सातत्याने खबरदारी घेत आहेत. या संदर्भात, सलमान खानने अलीकडेच त्याची कार अपग्रेड केली होती. एवढेच नाही तर काही दिवसांपूर्वी बॉलिवूडच्या भाईजानने मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेऊन स्वसंरक्षणासाठी शस्त्र ठेवण्याचा परवाना मागितला होता. याच क्रमाने आता या सलमान खानला मुंबई पोलिसांनी शस्त्र ठेवण्याचा परवाना दिला आहे. मात्र, शस्त्र परवाना मिळवणारा सलमान खान हा पहिला बॉलिवूड अभिनेता नाही. याआधीही अनेक चित्रपट क्षेत्रातील व्यक्तींनी हा परवाना घेतला आहे. चला जाणून घेऊया अशा बॉलिवूड कलाकारांबद्दल.

अमिताभ बच्चन बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्याकडेही बंदूक आहे. खुद्द बिगबींनी याबाबत माहिती दिली होती. वास्तविक, 2008 मध्ये मुंबईवर झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला होता. या हल्ल्याचा बिग बींवरही परिणाम झाला आहे. त्यामुळेच त्यांनी घटनेच्या काही दिवसांनंतर आपल्या ब्लॉगमध्ये  “रात्री झोपण्यापूर्वी मी माझे परवाना असलेले .32 रिव्हॉल्व्हर काढले, ते लोड केले आणि माझ्या उशाखाली ठेवले.” अशी माहिती दिली होती. यावरुनच त्यांनी शस्त्त्र परवाना घेतल्याचे समजले होते.

पूनम धिल्लो – ज्येष्ठ अभिनेत्री पूनम धिल्लो हिनेही बंदूक बाळगत असल्याची कबुली दिली आहे. एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने खुलासा केला होता की, “माझ्याकडे एक बंदूक आहे आणि सुरक्षेच्या कारणास्तव मी ती घरी ठेवली आहे. मी ती माझ्यासोबत ठेवत नाही.”

सोहा अली खान – बॉलिवूड अभिनेत्री सोहा अली खानला 1996 मध्ये शस्त्र परवाना मिळाला. त्यानंतर तिने एक रायफलही खरेदी केली होती. परंतु तिचे वय कमी असल्याने या प्रकरणावर मोठा वाद निर्माण झाल्यानंतर तिचे हे लायसेंस रद्द करण्यात आले.

सनी देओल बॉलिवूडचा प्रसिद्ध आणि पॉवरफुल एक्शन हिरो सनी देओलकडेही रिव्हॉल्व्हर आहे. रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्याने हे रिव्हॉल्व्हर त्याच्या ‘सिंह साब द ग्रेट’ चित्रपटासाठी वापरले होते.

हेही वाचा –

‘मी बालपणापासून संघ स्वयंसेवक’, दिग्पाल लांजेकरची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

ब्रेकिंग! ‘या’ प्रसिद्ध गायिकेचे निधन, कुटुंबियांंनी केली हळहळ व्यक्त

‘त्या’ प्रसंगानंतर शूटवरून घरी आल्यावर ढसाढसा रडली होती मृणाल ठाकूर, ‘अशी’ केली बॉलिवूडमध्ये एंट्री

हे देखील वाचा