Friday, July 5, 2024

२०२० ठरलं लकी! लॉकडाऊनमध्ये ‘हे’ ५ बॉलीवूड सेलिब्रिटी झाले आईबाबा

२०२० हे वर्ष आधीच कोव्हिड१९ मुळे वाईट ठरलं आहे त्यात काही कुटुंब अशी देखील आहेत ज्यांना कुटुंबासोबत वेळ घालवायला मिळाला म्हणून आनंदात आहेत. लॉकडाऊनच्या या कालावधीत करीना कपूर खान, अनुष्का शर्मा, कपिल शर्मा ह्या सेलब्झनी पालक होणार असल्याची गोड बातमी दिली परंतु काही सेलिब्रिटी असेही आहेत जे या लॉकडाऊन मध्ये पालक झाले आहेत. पाहुयात कोण आहेत हे सेलेब्झ!

१. अमृता राव – आर.जे. अनमोल
‘विवाह’, ‘लाईफ हो तो ऐसी’, ठाकरे यांसारख्या सिनेमात मुख्य भूमिका साकारलेली अभिनेत्री अमृता राव मागील महिन्यात १ नोव्हेंबरला आई झाली आहे. या अभिनेत्रीला पुत्ररत्न झालं असून त्याचं नाव वीर ठेवण्यात आलं आहे. अमृता आणि अनमोल यांची आई वडील होण्याची ही पहिलीच वेळ आहे. लागोपाठ ७ वर्षे एकमेकांना देट केल्यानंतर अनमोल आणि अमृता हे १५ मे २०१६ ला विवाहबद्ध झाले होते.

२. गौरव चोप्रा – हितीशा
टीव्ही आणि वेबसिरीज क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेता गौरव चोप्रासाठी जिथे लॉकडाऊनमध्ये आई वडिलांना गमवावं लागलं होतं तिथे त्याच्या घरी एक नवा पाहुणा आल्याने पुन्हा आनंदी वातावरण पाहायला मिळालं. १९ आणि २९ ऑगस्ट रोजी गौरवचे आई वडील कायमचे त्याला सोडून गेले तर १४ सप्टेंबर रोजी त्याला मुलगा झाला. या अभिनेत्याने १९ फेब्रुवारी २०१८ मध्ये एका खाजगी कार्यक्रमात गर्लफ्रेंड हितीशा हिच्यासोबत लग्न केलं होतं. आत दोन वर्षानंतर हे जोडपं पहिल्यांदा आई बाबा झालं आहे.

३. शिखा सिंह – करण शाह
टीव्ही क्षेत्रात महाभारत, कुम कुम भाग्य सारख्या मालिकांमध्ये झळकणारी ही अभिनेत्री पहिल्यांदा आई झाली आहे. शिखा सिंह हिने १६ जून रोजी एक गोंडस मुलीला जन्म दिला. शिखाच्या म्हणण्यानुसार त्या दोघी पती पत्नीला विश्वास होता की याना मुलगीच होणार आणि तसं झाल्यास ते तिचं नाव अलायनाच ठेवणार. दोघेही तिला प्रेमाने अल अशी हाक मारतात.

४. एकता कौल – सुमित व्यास
मालिका क्षेत्रातील अभिनेत्री एकता आणि तिचा पती सुमित हे लॉकडाऊनच्या काळातच आई बाबा झाले आहेत. एकताने ४ जून रोजी एक गोंडस मुलाला जन्म दिला. आणि याबद्दलची माहिती या दोघांनीही आपापल्या सोशल मीडिया अकाउंट वरून दिली होती. या दोघांनीही आपल्या मुलाचं नाव वेद ठेवलं आहे.

५. स्मृती खन्ना – गौतम गुप्ता
मेरी आशिकी तुमसे ही फेम अभिनेत्री स्मृती खन्ना आणि अभिनेता गौतम गुप्ता हे लॉकडाऊन मधेच १५ एप्रिल रोजी आई बाबा झाले. दोघांनीही आपल्या मुलीचं नाव अनायका ठेवलं आहे. हे कुटुंब सध्या जुहू ला राहतं.

६. रुस्लान मुमताज – निराली
२६ मार्चला बालिका वधू कार्यक्रमातून तसेच एमपी३ या सिनेमातून झळकणारा अभिनेता रुस्लान बाबा झाला आहे. निराली आणि रुस्लान हे पहिल्यांदा आई बाबा झाले असून दोघांनीही मुलाचं नाव रेयान ठेवलं आहे. लॉकडाऊनमुळे या दोघांना खूप अडचणींचा सामना करावा लागला. ज्या हॉस्पिटलमध्ये निरालीची प्रसूती झाली ते हॉस्पिटल कोरोनाच्या रुग्णांसाठी खुलं होतं. त्यामुळे डॉक्टरांनी या कुटुंबाला लवकरात लवकर घरी जाण्याचा सल्ला दिला.

७. नताशा स्तानकोविक – हार्दिक पंड्या
डीजे वाले बाबू या गाण्यात तसेच झिरो सिनेमात झळकणाऱ्या या अभिनेत्रीने ३१ मे ला हार्दिक सोबत प्रेग्नेंसी आणि लग्नाची बातमी देऊन सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. हार्दिक ने नताशाला १ जानेवारी रोजी प्रपोज केलं होतं. ३० जुलै ला नताशा ने एक गोंडस मुलीला जन्म दिला होता. जीचं नाव या दोघांनी अगस्त्या असं ठेवलं आहे.

८. मानसी शर्मा – युवराज हंस
छोटी सरदारनी या कर्यक्रमात दिसलेली अभिनेत्री मानसी तसेच गायक युवराज हे दोघेही १२ मे रोजी आई बाबा झालेत. या दोघांनाही पुत्ररत्न झालं आहे. ही आनंदाची बातमी अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडिया अकाउंट वरून दिली होती. या दोघांनी आपल्या मुलाचं नाव हृदान ठेवलं आहे.

हेही वाचणं आहे महत्त्वाचं
बॉलिवूड अभिनेत्रींचा अजब कारभार! विवाहित पुरुषांसोबत बांधली लगीन गाठ
ब्रेकअप, घटस्फोट आणि पुन्हा लग्न, बॉलिवूडकरांची नात्यांची खिचडी
बॉलिवूड अभिनेत्रींच्या हटके लव्ह स्टोरी, कमी वयाच्या नायकांसोबत बांधली लगीनगाठ    
कलाकार आणि त्यांच्या अजब सवयी; वाचून तुम्ही ही म्हणाल असं कुठं असतं का?

हे देखील वाचा