[rank_math_breadcrumb]

बेली डान्सर ते अभिनेत्री असा प्रवास, प्रेमासाठी धर्मांतर केले, तर घटस्फोटानंतर पूर्णपणे बदललं आयुष्य

बॉलिवूड नायिका अमृता सिंगने कमी कारकिर्द असूनही, चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवला. आज अमृताचा ६८ वा वाढदिवस आहे.तर अनेक चाहत्यांनी तिला सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या आहेत.पण अमृता सिंग बॉलिवूड नायिका होण्यापूर्वी बैले डान्सर होती. तर लग्नासाठी इस्लाम धर्म स्वीकारला.आणि काहि काळाने लग्नानंतर तिने घटस्फोट घेतला.

अमृता सिंगचा (Amrita Singh)जन्म एका पंजाबी कुटुंबात झाला.तिच्या कुटुंबात तिचे वडील लष्करी अधिकारी शिविंदर सिंग विर्क काम करत. तर ती लेखकाची पणतू आणि अयुबची चुलत बहीण आहे.बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्यापूर्वी, ती बेली डान्सर होती. तिने बेली डान्सिंग शिकले आणि काही स्टेज शोमध्येही सादरीकरण केले. तिने सनी देओल अभिनीत “बेताब” चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, ज्याला प्रेक्षकांकडून प्रचंड टीकात्मक प्रशंसा मिळाली. “बेताब” नंतर अमृताचे यश अखंडपणे सुरू राहिले. सनी देओलसोबतची तिची जोडी हिट ठरली आणि नंतर त्यांनी १९८५ मध्ये “मर्द” आणि “साहेब” सारख्या चित्रपटांमध्ये काम केले. त्यानंतर, तिने “चमेली की शादी”, “नाम”, “खुदगर्ज” आणि “वारीस” यासारख्या अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये काम केले. तर तिच्या कुटुंबाने तिच्या सर्व प्रयत्नांमध्ये नेहमीच तिला पाठिंबा दिला.

सैफ अली खान, जो इंडस्ट्रीमध्ये स्थान मिळविण्यासाठी संघर्ष करत होता, तेव्हा अमृताची – सैफ अली खानची भेट झाली . सैफ आणि अमृतामध्ये १२ वर्षांचे अंतर होते, परंतु ते खूप प्रेमात होते. सर्व अडचणी असूनही, शीख धर्मात वाढलेल्या अमृताने लग्नापूर्वी इस्लाम धर्म स्वीकारला आणि इस्लामिक रितीरिवाजांनुसार एका खाजगी समारंभात लग्न केले. या जोडप्याला सारा अली खान आणि इब्राहिम अली खान ही दोन मुले होती. १३ वर्षांच्या लग्नानंतर सैफ आणि अमृताचा घटस्फोट झाला आणि सैफने करीना कपूरशी लग्न केले.

अमृता सिंगने पुन्हा लग्न केले नाही आणि तिच्या कोणाशीही नातेसंबंध असल्याच्या बातम्याही समोर आल्या नाहीत. घटस्फोटानंतर अमृता एकटे जीवन जगत आहे. अमृताची मुलगी सारा अली खान देखील बॉलिवूड स्टार बनली आहे.  तर तिचा मुलगा इब्राहिम अली खान देखील चित्रपटसृष्टीत आपले पाय रोवत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा  

व्हॅलेंटाईन वीकमध्ये सैयारा पुन्हा होणार रिलीझ, मोठी अपोेडेट आली समोर