होय, भारतात असं होतंच… जेव्हा गाण्यातील शब्दांमुळे रातोरात बदलावी लागली ‘ही’ गाणी; पाहा यादी

लेखक जेव्हा केव्हा काही क्रिएटिव्ह लिहीत असतो, त्यावेळी त्याचं लिखाण हे एकतर प्रसिद्धीचं टोक गाठतं किंवा विवादात तरी सापडतं. असंच या गाण्यांबाबत झालं होतं.


लेखक जेव्हा केव्हा काही क्रिएटिव्ह लिहीत असतो, त्यावेळी त्याचं लिखाण हे एकतर प्रसिद्धीचं टोक तरी गाठतं किंवा एक तर ते विवादात तरी सापडतं. लेखक लिहिताना लिहीत जातो, लिहीत जातो आणि मग लिहिल्यानंतर त्याला सगळं काही योग्य वाटलं तर त्या लिखाणाची कलाकृती बनते.

परंतू, कधी कधी त्या लिखाणातील एखादा परिच्छेद, एखादं वाक्य किंवा एखादा शब्दच समाजातील एखाद्या गटाला अपमानास्पद किंवा समाजाच्या दृष्टीने अहितकारक वाटतो. आणि मग त्या लेखकाला त्याच्या कालाकृतीमध्ये बदल करावेच लागतात.

हीच प्रक्रिया बॉलिवूडच्या बाबतीत तर नेहमीच घडत आलीये. सध्या आपण गाण्यांच्या शब्दांबद्दल बोलणार आहोत जे पुढे जाऊन या निर्मात्यांना बदलावे लागले होते. चला बघुयात अशी कोणती गाणी आहेत जी होती हिट मात्र तरीही त्यांच्यात बदल हे करावेच लागले होते.

बेयॉन्से शर्मा जायेगी – चित्रपट खाली पिली

अनन्या पांडे आणि ईशान खट्टर स्टारर चित्रपट खाली पीलीचं हे गाणं बेयॉन्से शर्मा जाएगी प्रदर्शित झाल्या झाल्या विवादात सापडलं. तुझे देख के गोरिया, बेयॉन्से शर्मा जाएगी हे गाण्याचे बोल असल्यामुळे मेकर्स वर रंग भेदभाव केल्याचे आरोप लावले गेले.

या सोबतच अमेरिकन पॉप स्टार बेयॉन्सेने तिच्या नावावर कॉपीराइट ठेवले आहेत ज्यामुळे मेकर्सना कायदेशीर बाबींना सामोरं जावं लागलं असतं. वाद वाढल्यानंतर बेयॉन्से शर्मा जाएगी च्या ऐवजी बदलून दुनिया शर्मा जाएगी असा बदल केला गेला. नव्या बदलांसाहित असलेल्या गाण्याला जुन्या गाण्याच्या जागी रातोरात बदललं गेलं.

सेक्सी, सेक्सी, सेक्सी – चित्रपट खुद्दार

करिश्मा कपूर और गोविंदा स्टारर चित्रपट खुद्दार १९९४ साली प्रदर्शित झाला आणि जबरदस्त हिट ठरला. परंतू, या चित्रपटातील आयटम साँग ‘सेक्सी सेक्सी सेक्सी’ खूप विवादास्पद राहिल होतं. गाण्याचे बोल त्याकाळानुसार खूपच बोल्ड समजले गेले. खूप लोकांनी आक्षेप नोंदवल्यानंतर सेक्सी शब्दाला बेबी या शब्दाशी जोडलं गेलं. यानंतर गाणं बेबी, बेबी, बेबी मुझे लोग बोलें या बदलांनुसार बदलण्यात आलं.

अच्छे दिन कब आएंगे – फन्ने खां

साल २०१८ मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट फन्ने खांचं गाणं अच्छे दिन कब आएंगे वर खूप वादंग उठले. अच्छे दिन आने वाले हैं भाजपची अच्छे दिन आने वाले हैं हे पक्षाचं घोषवाक्य आहे. ज्यामुळे पक्षाच्या नेत्यांनी यावर खूप विरोध दर्शविला होता. काही दिग्गजांच्या दबावाला बळी पडून गाण्याचे बोल बदलले गेले आणि अच्छे दिन अब आए रे अशा नव्या बदलासह गाणं प्रदर्शित केलं गेलं.

आय वॉन्ट फक्त यु – जोकर

साल २०१२ मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट जोकर एक सुपर डुपर फ्लॉप ठरला होता. परंतु चित्रपटामधील गाणं आय वॉन्ट फक्त यू चर्चेचा विषय ठरलं होतं. गाण्यामध्ये वापरला गेलेला मराठी शब्द फक्त याचा इंग्रजी मध्ये आपत्तीजनक अर्थ निघतो. आणि मराठी मध्ये तर आपल्याला माहीतच आहे फक्त म्हणजे काय ते…गाण्याचे बोल डबल मिनींग वाटत असल्याने बोल बदलून आय वॉन्ट जस्ट यु असा बदल केला गेला.

राधा – स्टुडंट ऑफ द इयर

‘स्टुडंट ऑफ द ईयर’ या चित्रपटाचं पार्टी साँग राधा चांगलंच गाजलं. या गाण्याच्या बोलांमध्ये सेक्सी राधा हा शब्द वापरला गेला होता. पण वाद टाळण्यासाठी निर्मात्यांनी सेक्सीऐवजी देसी राधा असा शब्दबदल केला.

आजा नच ले टायटल साँग – आजा नच ले

माधुरी दीक्षित स्टारर चित्रपट ‘आजा नच ले’च्या टाइटल साँगचे बोल, मोहल्ले में कैसी मारा मार है, बोले मोची भी खुद को सुनार है यामुळे खूप मोठा विवाद उभा राहिला होता. या गाण्याच्या ओळींमुळे जातीयवादाचा मुद्दा भडकला आणि दलित नेत्यांनी दर्शविलेल्या विरोधामुळे गाण्याचे बोल बदलून, मेरे दर पर दीवानों की बहार है असा बदल केला गेला होता.


Leave A Reply

Your email address will not be published.