आजकाल Ott प्लॅटफॉर्म वरती अनेक प्रकारचे कंटेंट उपलब्ध आहेत. तसेच ओटीटी प्लॅटफॉर्म सुरू झाल्यापासून अनेक प्रेक्षक हे घरबसल्या जे पाहिजे ते पाहू शकत आहेत. त्यामुळे Ott कंटेंटचा क्रेझ वाढत आहे. तसेच बॉलिवूड चित्रपट सोबतच दक्षिणात्य चित्रपटांनी सुद्धा आपले स्थान निर्माण केले आहे. आणि Ott सीरीजिने सुद्धा आपले स्थान निर्माण केले आहे. ‘मिर्झापूर’ ही सिरीज इतकी गाजली की आता याचा चित्रपट ही येत आहे.
‘मिर्झापूर’ या सिरीजचा 2018 मध्ये सुरू झालेला हा प्रवास, तीन यशस्वी सीझनंतर आता चौथ्या सीझनच्या प्रतीक्षेच्या टप्प्यावर पोहोचला आहे. या ‘मिर्झापूर’ मधील कलाकांरच्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात या मालीकेने घर निर्माण केली आहे.’मिर्झापूर’ या सिरीजला 8.4 च्या प्रभावी IMDb रेटिंगसह, या मालिकेने हे सिद्ध केले की प्रेक्षकांना आता केवळ ग्लॅमरस शहरी कथाच नव्हे, तर त्यांच्या सभोवतालचे वास्तवही पाहायचे आहे.
‘मिर्झापूर’ या सिरीजचे सर्वात मोठे यश म्हणजे तिच्या कलाकारांना मिळालेले प्रचंड प्रेम आणि ओळख आहे. पंकज (Pankaj)त्रिपाठीसारखे कलाकार इंडस्ट्रीत आधीपासूनच सक्रिय असले तरी, ‘कालीन भैय्या’ या भूमिकेने त्यांना दिलेली जागतिक प्रसिद्धी अतुलनीय होती. त्याचप्रमाणे, दिव्येंदू शर्मा ‘मुन्ना भैय्या’ अली फजल आजही ‘गुड्डू पंडित’ म्हणून आणि विक्रांत मेस्सी ‘बबलू पंडित’ म्हणून ओळखले जातात. या कलाकारांसाठी, ‘मिर्झापूर’ हा केवळ एक प्रोजेक्ट नसून त्यांच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला. तर मिर्झापूर या सीरीजवर येणारा मिर्झापूर द फिल्म हा चित्रपट यावर्षी 4 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होईल. तो ओटीटीच्या आधी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होईल.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
धुरंदर 2ची बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई, गदर चित्रपटालाही टाकले मागे










