Monday, April 6, 2026
Home टेलिव्हिजन ‘रामायण’मधील या अभिनेत्याने एकाच वेळी तीन भूमिका साकारल्या, तर आता राहतो या झगमगाटापासून दूर

‘रामायण’मधील या अभिनेत्याने एकाच वेळी तीन भूमिका साकारल्या, तर आता राहतो या झगमगाटापासून दूर

टेलिव्हिजन विषयामध्ये अशा अनेक मालिका आहे ज्यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले. अशीच एक सिरीयल म्हणजे रामानंद सागर यांची ‘रामायण’ आहे तर ही सिरीयल इतकी गाजली की आजही लोक या सिरीयल मधील साकारलेल्या अभिनेत्यांना विसरू शकत नाही तसेच यातील ज्या ज्या देवाची भुमिका साकरलेले अभिनेते आहेत त्यांना आजही प्रेक्षक देवा सारखे मानतात. ‘रामायण’ ही सीरीज 1987 मध्ये प्रसारित झाली होती. पण असे काही कलाकार आहेत जे काळाच्या ओघात ते मुख्य प्रवाहातून विस्मृतीत गेले. अशाच अज्ञात नायकांपैकी एक म्हणजे विजय कविश.

विजय (vijay)कविश यानी यामध्ये भगवान शिवाचे शांत, दिव्य रूप साकारल्यामुळे विजय कविश यांना सर्वाधिक लोकप्रियता मिळाली. त्यांच्या भारदस्त आवाजाने आणि सौम्य चेहऱ्याने शिवाच्या व्यक्तिरेखेला एक अनोखे आकर्षण दिले. पण त्यांची प्रतिभा केवळ इथपर्यंतच मर्यादित नव्हती, त्यांनी महाकाव्यात रावणाचे वडील, महर्षी विश्वराव यांची भूमिकाही उत्कृष्टपणे साकारली. इतकेच नाही, तर जेव्हा ‘उत्तर रामायण’ प्रसारित झाले, तेव्हा त्यांनी महर्षी वाल्मीकींच्या भूमिकेतून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. एकाच मालिकेत इतकी भिन्न पात्रे इतक्या सखोलतेने आणि गांभीर्याने साकारण्याची विजय कविश यांची क्षमता त्यांच्या अभिनयकौशल्याचा पुरावा होता.

विजय कविश हे हळूहळू अभिनयाच्या झगमगाटापासून दूर गेले, परंतु त्यांच्या कलेप्रती असलेली त्यांची निष्ठा अढळ राहिली. तर आता काळानुसार त्याच्या व्यक्तिमत्त्वातही लक्षणीय बदल झाला आहे. त्याचा लूक पूर्णपणे बदलला आहे, ज्यामुळे ‘रामायण’मधील भगवान शिव म्हणून त्याला ओळखणेही कठीण झाले आहे.

करिष्मा तन्ना लवकरच होणार आई, सोशल मीडियावर शेअर केली गोड बातमी

हे देखील वाचा