Thursday, November 21, 2024
Home बॉलीवूड संभाजीची येसू ते पुष्पाची श्रीवल्ली; हे आहेत रश्मिकाचे आगामी सिनेमे…

संभाजीची येसू ते पुष्पाची श्रीवल्ली; हे आहेत रश्मिकाचे आगामी सिनेमे…

रश्मिका मंधना लवकरच ‘पुष्पा 2’ चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय देखील रश्मिका अनेक चित्रपटांमध्ये आपली जादू दाखवण्यासाठी सज्ज आहे. रश्मिकाचे अनेक आगामी चित्रपट आहेत, ज्यामध्ये ती रणबीर कपूर, विकी कौशल आणि सलमान खानसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. जाणून घेऊयात कोणते आहेत रश्मिकाचे आगामी चित्रपट. 

पुष्पा 2

हा चित्रपट ६ डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट २०२१  मध्ये रिलीज झालेल्या ‘पुष्पा 1: द राइज’ चा दुसरा भाग आहे. ‘पुष्पा 2: द रुल’ या चित्रपटात रश्मिका पुन्हा एकदा श्रीवल्लीच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. साऊथचा स्टायलिश स्टार अल्लू अर्जुन या चित्रपटात रश्मिकासोबत दिसणार आहे.

ॲनिमल पार्क 

यानंतर रश्मिका ‘ॲनिमल पार्क’ या चित्रपटातही दिसणार आहे. हा चित्रपट २०२३  मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ॲनिमल’ चा दुसरा भाग असेल. या चित्रपटात रश्मिका पुन्हा एकदा रणबीर कपूरच्या पत्नीची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप रेड्डी वंगा करणार आहेत. परंतु हा चित्रपट सुरु व्हायला अजून अवकाश आहे.

सिकंदर

रश्मिका या चित्रपटात बॉलिवूडच्या दबंग म्हणजेच सलमान खानसोबत दिसणार आहे. चाहत्यांना रश्मिका आणि सलमानची जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. सध्या सलमान खान या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. मुंबईतील शूटिंगचे पहिले शेड्युल पूर्ण झाले आहे. पुढील वर्षी ईदच्या मुहूर्तावर हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होऊ शकतो. सलमान आणि रश्मिकाची जोडी एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. 

द गर्लफ्रेंड

‘द गर्लफ्रेंड’ हा एक तेलगू रोमँटिक ड्रामा चित्रपट आहे ज्याचे लेखन आणि दिग्दर्शन राहुल रवींद्रन यांनी केले आहे. या चित्रपटात रश्मिका आणि दीक्षित शेट्टी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाचे संगीत हेशम अब्दुल वहाब यांनी दिले आहे. विद्या कोप्पिनिधी आणि धीरज मोगिलीनेनी यांनी संयुक्तपणे या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट ३० सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

छावा

या चित्रपटात रश्मिकासोबत विकी कौशल दिसणार आहे. हा एक ऐतिहासिक चित्रपट आहे. ‘छावा: द ग्रेट वॉरियर’ जाहीर झाल्यापासूनच चर्चेत आहे. चित्रपटाची कथा थोर मराठा राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित आहे. हा चित्रपट लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित करत आहेत. रश्मिका या चित्रपटात संभाजींच्या पत्नी येसूबाईच्या भूमिकेत दिसणार आहे. 

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा –

श्रद्धाने केली चाहतीची इच्छा पूर्ण ! सोशल मिडीयावर व्हायरल झाला व्हिडिओ …

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा