प्रदर्शनापुर्वी मोठ्ठे वाद, प्रदर्शनानंतर सुपरहिट्स तरीही परदेशात बंदी घातलेले भारतीय सिनेमे


आपल्या देशात प्रदर्शित होणारे असे अनेक सिनेमे आहेत जे त्यांच्या नायक, नायिका, गाणे, संगीत यांपेक्षा जास्त वादांमुळे चर्चेत आले. कधी चित्रपटांच्या विषयांवर होणारे वाद, कधी चित्रपटाच्या नावावर होणारे वाद, कधी गाण्यांवरून, गाण्यातील शब्दांवरून, अभिनेत्रींच्या कपड्यांवरून अशा अनेक लहान मोठ्या कारणांवरु प्रत्येक सिनेमा थोड्याफार प्रमाणात वादात अडकतोच. अशा चित्रपटाच्या यादीमध्ये अगदी पद्मावती, माय नेम इज खान, पीके, रामलीला, बजरंगी भाईजान, बाजीरावमस्तानी अशा अनेक चित्रपटांचा समावेश आहे. हे सिनेमे प्रदर्शनआधी भलेही वादात अडकले असतील मात्र प्रदर्शनानंतर हेच सिनेमे सुपरहिट देखील होतात. काही सिनेमे तर असे आहेत जे अनेक विवादानंतर भारतात प्रदर्शित झाले, पण इतर देशांमध्ये त्या चित्रपटांच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली होती. पाहूया अशाच काही चित्रपटांची नावे.

ओह माय गॉड-
२०१२ साली आलेला परेश रावल आणि अक्षय कुमार यांची मुख्य भूमिका असणारा हा सिनेमा कथेवरून वादात अडकला होता. सिनेमात कांजीलाल मेहता म्हणजेच परेश रावल सर्व धर्मांच्या देवांवर कोर्टात केस टाकतो. यातच देवाच्या नावावर धंदा करणाऱ्या लोकांवरही या चित्रपटातून टीका करण्यात आली होती. अनेक वादानंतर हा चित्रपट प्रदर्शित होत सुपरहिट ठरला. मात्र काही देशांमध्ये हा सिनेमा बॅन झाला.

द डर्टी पिक्चर-
२०११ मध्ये आलेला हा चित्रपट तुफान हिट झाला. विद्याने यात लोकप्रिय बोल्ड अभिनेत्री आणि डान्सर सिल्क स्मिताची भूमिका साकारली होती. सिनेमात नसीरुद्दीन शाह, इमरान हाशमी आणि तुषार कपूर मुख्य भूमिकेत होते. चित्रपटाचा बोल्ड कन्टेन्ट आणि संवाद यांमुळे हा सिनेमा कुवेतमध्ये बॅन झाला. पण भारतात या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला होता.

डेली बेली-
२०११ साली आलेला इम्रान खानचा डेली बेली हा सिनेमा तरुणांमध्ये खूप गाजला. सुरुवातीला चित्रपटात असणाऱ्या शिव्यांमुळे हा सिनेमा वादात अडकला होता. सिनेमातील ‘भाग डीके बोस’ या दुहेरी अर्थ असणाऱ्या गाण्यावरून देखील खूप वाद झाला. या वादांमुळे हा सिनेमा नेपाळमध्ये बॅन झाला होता.

रांझणा-
२०१३ साली आलेला सोनम कपूर, धनुष आणि अभय देओल यांचा ‘रांझणा’ चित्रपट खूप हिट झाला. पण हिंदू मुलीला मुस्लिम मुलावर प्रेम होते. अशी कथा असणारा हा सिनेमा पाकिस्तानमध्ये बॅन झाला होता.

उड़ता पंजाब-
२०१६ अली आलेला शाहिद कपूर, आलिया भट, करीना कपूर, दिलजीत दोसान्ज यांचा उड़ता पंजाब सिनेमा ड्रग्स या नाजूक विषयांवर आधारित होता. या सिनेमावर पंजाब राज्याने आक्षेप घेत राज्याचे नाव खराब होईल असा आरोप केला होत. अनेक सीन्स कट करून हा सिनेमा प्रदर्शित झाला. सिनेमाने अनेक कोटी रुपयांचा बिझनेस केला होता. मात्र अशा नाजूक विषयामुळे हा सिनेमा पाकिस्तानमध्ये बॅन झाला.

एक था टायगर-
२०१२ सलमान आणि कतरिना एक था टायगर सिनेमा प्रदर्शित झाला होता. यात सलमानने रॉ एजेंट टायगरची भूमिका साकारली होती तर कतरिनाने आईएसआई एजेंट जोयाची भूमिका केली. यात हे दोन्ही एजेंट एकमेकांच्या प्रेमात पडतात. भारत पाकिस्तानच्या खराब संबंधांमुळे हा सिनेमा पाकिस्तानमध्ये बॅन झाला होता.

फिजा-
२००० साली आलेल्या ऋतिक रोशन, करिश्मा कपूर, जया बच्चन यांचा फिजा चित्रपटाने आतंकवाद सारख्या विषयांवर भाष्य केले होते. यात ऋतिक रोशन आतंकवादाकडे आकर्षित होतो असे दाखवले होते. हा चित्रपट मलेशियामध्ये पूर्णपणे बॅन केला होता.

तेरे बिन लादेन-
अली जफर आणि पीयूष मिश्रा यांचा २०१० साली आलेला तेरे बिन लादेन हा सिनेमा अल कायदाचा संस्थापक आणि आतंकवादी ओसामा बिन लादेन याच्यावर आधारित होता. विनोदी असणारा हा सिनेमा भारतात खूप चालला मात्र पाकिस्तानमध्ये त्यावर बंदी आली होती.

बॉम्बे-
१९९५ साली आलेला मनीषा कोइराला आणि अरविंद स्वामी यांचा बॉम्बे हा सिनेमा एक प्रेमकथा आहे. या चित्रपटाला बाबरी मस्जिद या वादावर बनवले होते. विवादित कथेमुळे हा सिनेमा सिंगापूरमध्ये बॅन झाला होता.

पॅडमॅन-
२०१८ पॅडमॅन हा सिनेमा अरुणाचलम मुरुगनंथम या व्यक्तिमत्वावर आधारित होता. जो त्याच्या पत्नीसाठी कमीतकमी पैशांमध्ये सॅनेटरी पॅड तयार करतो. अक्षय कुमार, राधिका आपटे, सोनम कपूर यांच्या ह्या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्काराने देखील गैरवण्यात आले होते. मात्र विवादित कथेमुळे हा सिनेमा पाकिस्तानात बॅन झाला.


Leave A Reply

Your email address will not be published.