Monday, July 1, 2024

असे जगप्रसिद्ध सेलिब्रिटीज ज्यांना घेतलं होतं दत्तक, पुढे स्वकर्तृत्त्वावर मिळवलं सगळं काही

वैवाहिक जीवनामध्ये प्रत्येक जोडप्याला आईबाबा व्हावंसं वाटत असतं. अनेक जण बाळाला जन्म देतात देखील परंतु काही जणांना मात्र ते सुख अनुभवता येत नाही. ते त्यांच्या बाळाला जन्म देऊ शकत नाहीत आणि अशा वेळेस ही जोडपी बाळ दत्तक घेऊन त्याच्यावर प्रेम करतात. त्याचं पालनपोषण करतात. सामान्य लोकांप्रमाणेच सेलिब्रिटीजही बऱ्याचदा मूल दत्तक घेतात. परंतु आज आपण त्या सेलिब्रिटींबद्दल बोलणार आहोत जे स्वतः दत्तक पुत्र आहेत. परंतु त्यांच्या कर्माने त्यांनी त्यांच्या आईवडिलांचं नाव मोठं केलं आहे.

राजेश खन्ना
बॉलिवूडचे काका म्हणजेच राजेश खन्ना यांनी ६०-७० च्या दशकात हिंदी चित्रपटात एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट केले आणि ते बॉलिवूडचे पाहिले सुपरस्टार बनले. राजेश यांचा जन्म २९ डिसेंबर १९४२ ला लाल हिरानंद खन्ना आणि चंद्रानी खन्ना यांच्या पोटी झाला होता. जतिन खन्ना असं त्याचं खरं नाव होतं. परंतु, त्यांच्या आईने आपल्या जावेला वचन दिलं होतं की ती आपला मुलगा राजेशला तिला दत्तक देईल आणि त्यानंतर राजेशच्या काका-काकूने त्यांना दत्तक घेतलं. सुपरस्टार राजेश खन्ना मात्र आज आपल्यात नाहीत. १८ जुलै २०१२ ला त्यांचं दीर्घ आजारपणामुळे निधन झालं.

बिल क्लिंटन
अमेरिकेचे 42 वे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांचे वडील विल्यम जेफरसन यांचा अपघातात मृत्यू झाला. जेव्हा वडिलांचा मृत्यू झाला तेव्हा बिल फक्त 3 महिन्यांचेच होते. यानंतर, त्यांच्या आईने पुन्हा लग्न केलं आणि वयाच्या १५ व्या वर्षी क्लिंटन कुटुंबाने बिल यांना दत्तक घेतलं आणि ते बिल क्लिंटन म्हणून नावारूपास आले. बिल यांचा जन्म १९ ऑगस्ट १९४६ ला झाला असून सध्या ते ७४ वर्षांचे आहेत.

अर्पिता खान
बॉलिवूडचा दबंग खान म्हणजेच सलमान खानची बहीण अर्पिता दत्तक घेण्यात आली आहे, ही गोष्ट कोणापासून लपलेली नाही. सलमान खानचे वडील सलीम खान यांनी अर्पिताला दत्तक घेतलं. खरं तर, सलीम खान दररोज भीक मागत असणार्‍या एका महिलेला जेवण देत असत. तिची एक लहान मुलगीही तीच्याबरोबर राहत होती. नेहमीप्रमाणे सलीम खान एक दिवस त्या बाईला जेवण द्यायला गेले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की त्या बाईचं निधन झालं आहे आणि तिची लहान मुलगी रस्त्यावर एकटीच रडत आहे. सलीम यांना ते दृश्य पाहवलं नाही आणि ते अर्पिताला आपल्या घरी घेऊन गेले. आज अर्पिता खान कुटुंबातील सर्वांची आवडती लेक आहे. सलमानचा तर अर्पितावर विशेष जीव आहे. अर्पिता आज ३१ वर्षांची असून तीच लग्न बॉलिवूड अभिनेता आयुष शर्मा याच्याशी झालं आहे तर त्यांना अहिल हा मुलगा देखील आहे.

स्टीव्ह जॉब्स
जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक असलेल्या ऍपलचे सह-संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांचं नाव सर्वांना माहित आहे. परंतु,२४ फेब्रुवारी १९५५ ला जन्मलेल्या स्टीव्ह हे स्वतः दत्तकपुत्र असल्याचं फार कमी लोकांना ठाऊक आहे. वास्तविक, स्टीव्ह यांच्या जन्मानंतर त्यांना पॉला आणि क्लारा जॉब्जने दत्तक घेतलं होतं. पॉला आणि क्लारा असं जोडपं होतं ज्यांना एकमेकांना समजून घ्यायला त्रास होत होता. अशा परिस्थितीत त्यांनी स्टीव्हला आपला मुलगा मानलं आणि त्यांचा सांभाळ केला. आज स्टीव्ह आपल्यामध्ये नसले तरी त्यांच्या आई वडिलांचं नाव त्यांनी किती मोठं केलं हे आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे.

नेल्सन मंडेला
अब्राहम लिंकन आणि मार्टिन ल्यूथर किंग यांच्या विचारांनी प्रभावित दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष नेल्सन मंडेला दिलदार व्यक्ती होते. जेव्हा ते 9 वर्षांचे होते तेव्हा त्यांना थेबुचे राजा जोंगींटाबा डालिंगडीएबो यांनी दत्तक घेतलं. मंडेला यांनी कायद्याचा अभ्यास केला. महात्मा गांधी यांच्या सत्याग्रहाची ताकद समजून घेऊन त्यांनी दक्षिण आफ्रिकेत सत्याग्रह केला आणि दक्षिण आफ्रिकेच्या स्वातंत्र्य चळवळीत महत्त्वपूर्ण योगदान दिलं. नेल्सन मंडेला हे दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपिता होते.

हे देखील वाचा