Thursday, November 21, 2024
Home बॉलीवूड सैफ अली खान ते उर्मिला मातोंडकरपर्यंत ‘यांनी’ थाटलाय वयाच्या ४०व्या वर्षी संसार, वाचा त्यांची कहाणी

सैफ अली खान ते उर्मिला मातोंडकरपर्यंत ‘यांनी’ थाटलाय वयाच्या ४०व्या वर्षी संसार, वाचा त्यांची कहाणी

प्रेमात वय बघितले जात नाही, ही गोष्ट अनेकवेळा लग्नाच्या बाबतीत देखील लागू होते. साधारण एखाद्या व्यक्तीला लग्न करण्यासाठी 25-30 हे वय योग्य मानले जाते. परंतु बदलत्या काळानुसार लग्नाचे वय देखील बदलले आहे. आजकाल ज्या वयात लोकांना त्यांचे खरे प्रेम मिळते, त्या वयात ते लग्न करण्याचा निर्णय घेतात. असेच काहीसे बॉलिवूडमध्ये देखील बघायला मिळते. बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत,‌ ज्यांनी वयाच्या 25-30 नाहीतर तब्बल 40व्या वर्षी देखील लग्न केले आहे. चला तर आता आपण त्या कलाकरांबाबत जाणून घेऊया ज्यांनी वयाचे 40 वर्ष झाल्यानंतर लग्नगाठ बांधली आहे.

सैफ अली खान
सैफ अली खान हा बॉलिवूडचा एक लोकप्रिय अभिनेता आहे. तो त्याच्या व्यावसायिक आयुष्यासोबतच वैयक्तिक आयुष्यामुळेही जास्त चर्चेत राहिला आहे. अभिनेत्याने दोन वेळा लग्न केले आहे. त्यामुळे तो खूप चर्चेत होता. त्याचे पहिले लग्न 21 व्या वर्षी अभिनेत्री अमृता सिंगसोबत झाले होते. परंतु नंतर त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर त्याने त्याच्यापेक्षा 13 वर्षांनी लहान अभिनेत्री करीना कपूरसोबत लग्न केले. त्याचे दुसरे लग्न झाले तेव्हा तो 40 वर्षाचा होता. (From saif to urmila these stars got married after crossing the age of 40)

नीना गुप्ता
अभिनेत्री नीना गुप्ता या देखील त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत होत्या. एक वेळ होती जेव्हा नीना गुप्ता पूर्व क्रिकेटर विवियन रिचर्ड्सला डेट करत होत्या. या दरम्यान त्यांनी एका मुलीला जन्म दिला. जिचे नाव मासाबा गुप्ता हे आह. परंतु नीना आणि विवियन यांनी लग्न केले नव्हते. नंतर तिने 2018 साली दिल्लीमधील सीए विवेक मेहरासोबत लग्न केले. त्यावेळी नीना यांचे वय 46 होते.

प्रीती झिंटा
आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने 90च्या दशकात सर्वांना वेड लावणारी प्रीती झिंटा हिने 40व्या‌वर्षी अमेरिकन बिस्नेसमॅन आणि तिचा बॉयफ्रेंड गुडइनफसोबत लग्न केले. त्या दोघांनी गुपचूप लग्न केले होते. त्यांच्या लग्नाची बातमी कोणालाच माहित नव्हती. प्रीती तिच्या पतीपेक्षा 10 वर्षांनी मोठी आहे. पण त्यांच्यात या गोष्टीचा काहीच फरक पडत नाही.

कबीर बेदी
अभिनेता कबीर बेदी याने त्याच्या आयुष्यात तब्बल चार वेळा लग्न केले. त्याने त्याचे पहिले लग्न १९६९ मध्ये प्रोतिमा बेदी हिच्यासोबत केले होते. परंतु काही वर्षानंतर त्या दोघांचा घटस्फोट झाला. यानंतर त्याने फॅशन डिझायनर सुशासनसोबत लग्न केले. परंतु त्यांचे नाते देखील यशस्वी झाले नाही आणि त्यांनी देखील घटस्फोट घेतला. कबीरने तिसरे लग्न रेडियो प्रेजेंटर निक्कीसोबत केले होते. परंतु यावेळी देखील त्यांच्या नात्यात काही कटुता आली आणि ते वेगळे झाले. तीन वेळा लग्न मोडून देखील कबीरचा प्रेमावरचा विश्वास उडाला नाही. त्याने त्याच्या 70 व्या वाढदिवशी परवीनसोबत लग्न करण्याची घोषणा केली, त्यामुळे सगळेच हैराण झाले होते.

उर्मिला मातोंडकर
अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने वयाच्या 43 व्या वर्षी काश्मिरी बिझनेसमॅन आणि मॉडेल मोहसीन अख्तरसोबत लग्न केले. तिचा पती तिच्यापेक्षा 9 वर्षांनी लहान आहे. त्या दोघांचे लग्न अगदी थाटामाटात झाले होते. लग्नात अनेक लोक सहभागी झाले होते.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
राखीच्या आयुष्यात पुन्हा आले वादळ, पती आदिल दुर्राणीवर केला गंभीर आरोप; म्हणाली, ‘मला श्रद्धा …’

 जेव्हा दिग्दर्शकाने वहीदा रहमान यांना सांगितले सापाला किस करायला, ‘अशी’ होती अभिनेत्रीची प्रतिक्रिया

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा