सध्या मनोरंजन जगतात ओटीटी फ्लॅटफॉर्मची जबरदस्त क्रेज पाहायला मिळत आहे. दररोज ओटीटीच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे, निर्माते लोकांसाठी दररोज काहीतरी नवीन कार्यक्रम प्रदर्शित करत आहेत. प्रत्येक नवीन आठवड्याची सुरुवात होताच प्रेक्षक नवीन सिरीज आणि चित्रपट प्रदर्शित होण्याची आतुरतेने वाट पाहत असतात. डिजिटल प्लॅटफॉर्मची क्रेझ इतकी वाढली आहे की लोक आता टीव्ही आणि सिनेमापेक्षा ओटीटीवर जास्त वेळ घालवत आहेत. प्रेक्षकांची ही वाढती क्रेझ पाहता निर्माते वेळोवेळी सिरीज आणि चित्रपट OTT वर रिलीज करत असतात. चला तर मग जाणून घेऊया या आठवड्यात होणार्या चित्रपट आणि वेबसिरीज.
डिअर विक्रम – डिअर विक्रम हा केएस नंदिश दिग्दर्शित आणि जेकब फिल्म्स बॅनरद्वारे निर्मित एक राजकीय थ्रिलर चित्रपट आहे. चित्रपटाच्या कलाकारांमध्ये सतीश निनासम, श्रद्धा श्रीनाथ, वशिष्ठ एन. सिम्हा, रक्षा सोमशेकर आणि सोनू गौडा या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.या चित्रपटाचे नाव सुरुवातीला गोध्रा असे होते, परंतु काही समस्यांमुळे निर्मात्यांनी नाव बदलले. हा कन्नड चित्रपट 30 जून रोजी Voot Select वर प्रदर्शित होणार आहे.
धाकड – हा रजनीश घई दिग्दर्शित आणि सोहेल मकई निर्मित बॉलीवूड अॅक्शन चित्रपट आहे, ज्यात बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणौत आहे. या चित्रपटात अभिनेत्री रॉ एजंटच्या भूमिकेत दिसत आहे. मात्र, हा चित्रपट प्रेक्षकांनी नाकारला होता. अशा परिस्थितीत बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाल्यानंतर आता हा चित्रपट झी ५ वर १ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.
मियाँ बीवी और मर्डर – ओटीटी प्लॅटफॉर्म एमएक्स प्लेयर लवकरच ‘मियां बीवी और मर्डर’ द्वारे लोकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे. या सिरीजमध्ये सस्पेन्स थ्रिलरसोबतच कॉमेडीची झलकही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. एमएक्स प्लेअरच्या या मालिकेत राजीव खंडेलवाल मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ही मालिका १ जुलैपासून प्रसारित केली जाऊ शकते.
सम्राट पृथ्वीराज- बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा ‘सम्राट पृथ्वीराज’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई करू शकला नाही. 200 कोटींचे बजेट असलेल्या या चित्रपटाने फारच कमी कलेक्शन केले. अशा स्थितीत आता चित्रपटाचा थोडासा उरलेला भाग वाचवण्यासाठी आता हा चित्रपट 1 जुलै रोजी Amazon Prime Video वर प्रदर्शित होणार आहे.
शट अप सोना – हा चित्रपट गायिका सोना महापात्रा हिने अनेक धमक्यांना न जुमानता पितृसत्ताविरूद्ध निर्भयपणे लढा दिला यावर आधारित आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटाचे दिग्दर्शन दीप्ती गुप्ता यांनी केले आहे आणि सोना मोहपात्रा निर्मित आहे. शट अप सोना 1 जुलै रोजी ZEE5 वर प्रीमियर होईल.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा