बॉलिवूड स्टार्स केवळ चित्रपटातून लाखो आणि कोट्यावधी रुपये कमवत नाहीत तर इतर व्यवसायातूनही चांगली कमाई करतात. विशेष गोष्ट अशी आहे की हे बॉलिवूड स्टार्स इतर कोणासोबत नव्हे तर आपल्या आयुष्यातील जोडीदारासोबत व्यवसाय करतात आणि यातून त्यांनी बराच नफा देखील कमावला आहे. बॉलीवूडमध्ये असे एक किंवा दोन नव्हे तर अनेक स्टार्स सापडतील ज्यांनी आपल्या जोडीदारालाच आपला व्यवसाय भागीदार बनविला आहे आणि त्यांचा व्यवसाय देखील यशस्वी झाला आहे. तर मग आज आम्ही तुम्हाला अशा काही स्टार आणि स्मार्ट जोडप्यांविषयी सांगणार आहोत.
ट्विंकल खन्ना-अक्षय कुमार
अक्षय कुमार बॉलिवूड चित्रपटातून भली मोठी कमाई करतो, परंतु ट्विंकल खन्नाने बर्याच वर्षांपूर्वी चित्रपटांना निरोप दिला होता. परंतु, या स्टार जोडप्याने एकत्र स्वतःचं प्रोडक्शन हाऊस ‘हरि ओम प्रोडक्शन’ सुरू केलं. त्यांना या कंपनीकडून कोट्यावधींचा नफा होतो. अक्षय आपल्या चित्रपटांमधून बरीच कमाई करतो, तर ट्विंकल एक प्रसिद्ध लेखक, इंटिरियर डिझायनर आणि चित्रपट निर्माती आहे आणि या माध्यमातून तिला कोटींची कमाई होते.
शाहरुख खान-गौरी खान
शाहरुख आणि गौरी हे बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट जोडप्यांपैकी एक मानले जातातच परंतु हे दोघेही खूप चांगले व्यावसायिक भागीदार देखील आहेत. शाहरुख आणि गौरी दोघेही ‘रेड चिलीज एंटरटेनमेंट’ ही प्रॉडक्शन कंपनी चालवतात. गौरी खान एक प्रसिद्ध इंटिरियर डिझायनर आहे तसेच ती ‘गौरी खान डिझाइन्स’ ही कंपनीही चालवते.
शिल्पा शेट्टी-राज कुंद्रा
बॉलिवूडचं मजेदार जोडपं शिल्पा आणि राज हे लाइफ पार्टनर सोबतच बिझिनेस पार्टनरदेखील आहेत. २००९ मध्ये लग्नानंतर लवकरच शिल्पा आणि राज यांनी ‘व्ही ८ गॉमेट ग्रुप’मध्ये भागीदारी विकत घेतली. इतकंच नव्हे तर या दोघांनीही मुंबईतील वांद्रे आणि वरळी भागात बस्टियन नावाने रेस्टॉरंट्सही चालवत आहेत जे खूप प्रसिद्ध देखील आहे.
विराट कोहली-अनुष्का शर्मा
नव्याने पालक बनलेलं जोडपं म्हणजे विराट आणि अनुष्का हे सर्वोत्कृष्ट जोडीदार तर आहेतच तसेच यशस्वी व्यावसायिक भागीदारदेखील आहेत. विराट आणि अनुष्का स्वत:चे ‘नुश’ आणि ‘व्रोगन’ ब्रँड चालवतात. इतकंच नव्हे तर या दोघांनीही अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. अलीकडेच विराट आणि अनुष्काने एका फायनान्स अँड टेक कंपनी डिजीटमध्ये २.२ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. विराट आणि अनुष्का आपल्या वर्तमान तसेच भविष्याचीही अगदी योग्य पद्धतीने काळजी घेतात.