80 ते 90 च्या दशकात अनेक मालिका होऊन गेल्या त्यातीलच एक म्हणजे रामायण आणि महाभारत या सिरीयलला प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिले. त्यांच्या उत्तम प्रतिसादामुळे आजही त्यातील कलाकार देवतांप्रमाणे प्रेक्षक पूजतात. या सिरीयल मुळे अनेक प्रेक्षक आपली हातातले काम सोडून मालिका पाहत असत. जरी ही मालिका खूप आधी प्रदर्शित झाली असली तरी आज त्याचे एपिसोड्स फोन द्वारे आपण पाहू शकतो आणि याची क्रीज आजही इतकेच आहे. तर यातील कलाकार आता मोठे झाले आहेत. असाच महाभारत मधील सुदामाची भूमिका साकारणारा अभिनेता आता काय करतो हे जाणून घेऊयात..
सुदामाची भूमिका साकारणार अभिनेता आज टीव्हीपासून मराठी चित्रपटसृष्टीपर्यंतचे सुपरस्टार आहेत आणि त्यांच्या अभिनयाची ताकद ३८ वर्षांपासून ओळखली जात आहे. तर या अभिनेत्याचे नाव सुमित राघवन असे आहे. तर आता सुमित अभिनयाच्या दुनियेतील एक दिग्गज बनला आहे. सुमित राघवने महाभारतात श्रीकृष्णाचा मित्र सुदामाची भूमिका साकारली होती. टीव्हीवर दिसणारा हा सडपातळ मुलगा त्यावेळी फक्त 16 वर्षांचा होता आणि तो एक उत्कृष्ट अभिनेता बनला आहे.
सुमित (sumit)राघवन हा त्याच्या अभिनयात तो प्रचंड जीव ओतुन काम करतो. तर आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत सुमितने मराठी, बॉलीवूड, ओटीटी, नाट्य आणि टीव्ही इंडस्ट्रीमध्ये आपली छाप सोडली आहे. आज तो घराघरात ओळखला जातो. ‘साजन रे झूठ मत बोले’, ‘पुष्पा इम्पॉसिबल’, ‘संजीवनी’, ‘शुभ मंगल सावधान’ आणि ‘बडी दूर आये हैं’ यांसारख्या टीव्ही मालिकांनी त्याच्या कारकिर्दीला नवीन उंचीवर नेले. ‘हॉलिडे’, ‘माय नेम इज खान’, ‘फिराक’ आणि ‘कुछ लव्ह जैसा’ यांसारख्या उल्लेखनीय बॉलिवूड चित्रपटांमध्येही त्याने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.










