Sunday, February 1, 2026
Home मराठी ‘फुलाला सुगंध मातीचा’ फेम समृद्धीने केला मनमोहक फोटो शेअर; चाहता म्हणाला, ‘तू खरंच काळजाचा…’

‘फुलाला सुगंध मातीचा’ फेम समृद्धीने केला मनमोहक फोटो शेअर; चाहता म्हणाला, ‘तू खरंच काळजाचा…’

स्टार प्रवाह या वाहिनीवरील सगळ्याच मालिका सध्या ट्रेडिंग आहेत. प्रत्येक मालिकेचे कथानक उत्कृष्ट आहे, पण या सगळ्या मालिकांमध्ये एक मालिका चांगलीच लोकप्रिय ठरत आहे, ती मालिका म्हणजे ‘फुलाला सुगंध मातीचा’ होय. या मालिकेची कहाणी, शीर्षक गीत, पात्र, डायलॉग सगळ्यांनी आतापर्यंत प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. डोळ्यात पोलीस अधिकारी बनण्याचे स्वप्न घेऊन मोठी झालेली एक सर्वसामान्य घरातील मुलगी, पण संसाराचा‌ गाडा ओढताना ती तिच्या स्वप्नाचा त्याग करते. या सगळ्यात तिचा जोडीदार म्हणजे तिचा पती कसा नव्याने तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी उभारी देतो. ही कहाणी या मालिकेतून दाखवली आहे.

या मालिकेत प्रमुख भूमिकेत असणारी अभिनेत्री समृद्धी केळकरने तिच्या भूमिकेला उत्तम न्याय दिला आहे. तिचे पात्र चांगलेच गाजत आहे. तिच्या सालस स्वभावाने, अभ्यासू वृत्तीने आणि मनमिळावू स्वभावाने सगळ्यांचे प्रेम मिळवले आहे. समृद्धी सोशल मीडियावर देखील चांगलीच सक्रिय असते. तिचा एक फोटो सध्या सर्वत्र व्हायरल होताना दिसत आहे.

समृद्धीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचा एक फोटो शेअर केला आहे. समृध्दीने ब्लॅक एँड व्हाईट फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, तिने साडी नेसलेली आहे. त्यावर ज्वेलरी घातली आहे. हातात बांगड्या, कपाळी टिकली असा सगळा साजशृंगार केलेला दिसत आहे. समृद्धी खाली बघून हसताना दिसत आहे. (Fulala sugandh maticha fame samruddhi kelkar share her photo on social media)

हा फोटो शेअर करून तिने एक खास कॅप्शन देखील दिले आहे. तिने लिहिले आहे की, “तेरे हर सवाल का जवाब नहीं है मेरे पास, मैं यू नजरे झुका लुंगी, तुम समझ जाना.” तिचा हा फोटो तिच्या चाहत्यांना खूपच आवडला आहे. सगळेजण या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करताना दिसत आहेत. तिच्या एका चाहत्याने कमेंट केली आहे की, “एक सांगू तुला, तू खरंच काळजाचा ठोका चुकवला.” यासोबत अनेक चाहते या फोटोवर कमेंट करत आहेत.

‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेत समृद्धीसोबत अभिनेता हर्षद अटकरी मुख्य भूमिकेत आहे. हर्षदने याआधी ‘दुर्वा’, ‘अंजली’, ‘सारे तुझ्याचसाठी’ या मालिकेत काम केले आहे, तर समृध्दीने ‘लक्ष्मी सदैव मंगलम’ या मालिकेत काम केले आहे. ही मालिका हिंदीमधील ‘दिया और बाती हम’ या मालिकेचा रिमेक आहे. हिंदीमध्ये देखील ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अबब! मौनी रॉयने बिकिनीमध्ये केला इंटरनेटवर कहर, बोल्ड अंदाज पाहून चाहतेही झाले हैराण

-Bigg Boss OTT: शोवर भडकली माजी स्पर्धक सोफिया हयात; म्हणाली ‘करण जोहर सलमान खानपेक्षाही वाईट…’

-जेव्हा शाहरुख खानला महिला चाहती म्हणाली होती, ‘आय लव्ह यू अक्षय’; रंजक आहे ‘तो’ किस्सा

हे देखील वाचा