Saturday, April 12, 2025
Home बॉलीवूड भारतातच नाही, तर ‘गदर 2’चा डंका जगभरात; 18 दिवसांनंतर केली ‘छप्परफाड’ कमाई

भारतातच नाही, तर ‘गदर 2’चा डंका जगभरात; 18 दिवसांनंतर केली ‘छप्परफाड’ कमाई

‘हमारा हिंदुस्तान जिंदाबाद था, जिंदाबाद है और जिंदाबाद रहेगा’ हा डायलाॅग प्रत्येक भारतीच्या तोंड आहे. अनेजण हा डायलाॅग बोलताना ऐकायला मिळत आहे. हा डायलाॅग ‘गदर 2’ सिनेमातील आहे. या सिनेमात प्रसिद्ध अभिनेता सनी देओल आणि अमिषा पटेल झळकले आहेत. त्यांनी दमदार कामगिरी करून चाहत्यांच्या मनावर एक वेगळाच ठसा उमटवला आहे. ‘गदर 2’ चित्रपट प्रदर्शित होऊन 18 दिवस उलटून गेली आहेत. तरीही या चित्रपटाच्या क्रेझ कमी होत नाही.

‘गदर 2’ (Gadar 2) चित्रपट पहिल्या आठवड्यात बक्कळ कमाई केली. पण दुसऱ्या आठवड्यात हा चित्रपट कमाईच्या बाबतीत घसरला होता. आता परत एकदा या चित्रपटाच्या कमाईने डोकंवर काढले आहे. आता हा चित्रपट थांबण्याच नाव घेत नाही. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी 40 कोटीची कमाई केली होती. पण हा चित्रपट इतका चांगल्याचे कारण म्हणजे त्या स्टोरी लाईनशी जोडला गेलेला इमोशनल कनेक्शन आहे.

भारत पाकिस्तान वाद हा भारतीयांच्या आगदी जिव्हाळ्याचा विषय होता आहे आणि कायम राहील. लोक या विषयाशी
भावनिक रित्या जोडली गेली आहेत. जेव्हा भारत पाकिस्तान फाळणीवर एखादा पिक्चर बनतो तेव्हा लोक खूप भावनिक होऊन तो प्रत्येक भारतीय पाहतो. असे चित्रपट पाहताना भारतीय कधी हसतात, तर कधी रडतात देखील.

अमीषा पटेल आणि सनी देओल स्टारर चित्रपटाला 22 वर्षांनंतर दुप्पट प्रेम मिळत आहे. ‘तारा सिंग’ उर्फ ​​सनी देओलसह (Sunny Deol) देशभरातील प्रेक्षक ‘हिंदुस्तान झिंदाबाद’चा नारा देत आहेत. तिसरा वीकेंडला देखील हा चित्रपट कमाईच्या बाबतीत आघाडीवर आहे. ‘गदर 2’ ने रविवारी भारतात 450 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. तर भारतातील ‘गदर 2’चे एकूण कलेक्शन 460.55 कोटींवर पोहोचले आहे. ज्या वेगाने चित्रपटाची प्रगती होत आहे, ते पाहता हा चित्रपट ‘जवान’ रिलीज होण्यापूर्वीच 500 कोटींची कमाई करू शकतो, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. तर बॉक्स ऑफिसवर ‘गदर 2’ चित्रपटाने सोमवारी 600 कोटींचा टप्पा पार केला आहे. (‘Gadar 2’ earned 600 crores after 18 days at the box office)

अधिक वाचा- 
लीना यांच्याशी लग्न करण्यासाठी किशोर कुमार यांनी त्यांच्या आई-वडिलांसमोर रात्रभर गाणी गात मिळवली होती परवानगी
जॅकलिन फर्नांडिसच्या लेटेस्ट फोटोशूटने वाढवले सोशल मीडियाचे तापमान, फोटो तुफान व्हायरल

हे देखील वाचा