सनी देओल आणि अमिषा पटेल यांचा सुपरहिट सिनेमा असणाऱ्या ‘गदर’ चित्रपटांचा सिक्वल येत आहे. ‘गदर: एक प्रेम कथा’ या चित्रपटाच्या सिक्वलचे नाव असणार आहे ‘गदर २’. निर्मात्यांनी या सिनेमाचे मोशन पोस्टर देखील लाँच केले आहे. सनी देओलने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर हे मोशन पोस्टरही शेअर केले असून, हा चित्रपट २०२२ मध्ये प्रदर्शित होणार आहे.
चित्रपटाच्या मोशन पोस्टरचे संगीत खूपच इंटेंस असून, या पोस्टरमधून ‘गदर २’ मधील कलाकारांची नावे देखील रिव्हिल करण्यात आली आहे. पोस्टरच्या सुरुवातीला ‘कथा जारी है..’ येते आणि त्यानंतर सनी देओल, अमिषा पटेल, उत्कर्ष शर्मा यांची नावे येतात. सर्वात शेवटी चित्रपट, दिग्दर्शक आणि निर्मात्याचे नाव येते. या सिक्वलमध्ये देखील जुन्या सिनेमाची स्टारकास्ट ठेवण्यात आली आहे.
‘गदर २’ सिनेमाचे दिग्दर्शन देखील अनिल शर्मा करणार असून, या चित्रपटाची निर्मिती अनिल शर्माची प्रोडक्शन कंपनी आणि झी स्टुडिओज करत आहे. चित्रपटाची कथा शक्तीमान यांनी लिहिली आहे तर, मिथून सिनेमाला संगीत देणार आहेत. हे शेअर करताना सनी देओलने लिहिले की, “दोन दशकांनंतर प्रतीक्षा अखेर संपली. दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर ‘गदर २’ चे मोशन पोस्टर सादर करत आहे. कथा जारी है…”
चित्रपटाचा प्लॉट पहिल्या भागाप्रमाणे भारत-पाकिस्तानवर आधारित असेल. चित्रपटाच्या प्री-प्रोडक्शनचे काम आधीच सुरू झाले आहे. चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये तारा सिंग (सनी देओल) आपल्या मुलासाठी पाकिस्तानात पाऊल ठेवेल आणि त्यानंतर खरी कहाणी सुरू होईल. २००१ मध्ये आलेल्या ‘गदर: एक प्रेम कथा’ या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगली पसंती दिली होती. चित्रपटाची क्रेझ अशी होती की, लोक ट्रकमध्ये प्रवास करून सिनेमागृहात पोहोचले होते. लोक आजपर्यंत या चित्रपटाचे डायलॉग विसरले नाहीत.
चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांच्याबद्दल बोलायचे झाले, तर मागील काही काळापासून त्यांचा एकही सिनेमा आला नाही. त्यामुळे कदाचित हा चित्रपट त्यांची कारकीर्द पुन्हा रुळावर आणण्यास मदत करेल. करण देओलच्या कारकिर्दीला ‘पल पल दिल के पास’चा फारसा फायदा झाला नाही. आता देओल कुटुंबाला आशा आहे की, त्यांच्या ‘गदर २’ सह तो हिट हिरोच्या कॅटेगरीमध्ये येतील.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
–सनी लिओनीची लाडकी लेक झाली सहा वर्षांची, वाढदिवसानिमित्त गोंडस फोटो केले शेअर
–आदेशानंतरही ईडीच्या कार्यालयात हजर नाही झाली जॅकलिन, एजंसीने बजावला तिसरा समन्स