Friday, July 5, 2024

अभिमानास्पद! राष्ट्रीय पुरस्कार विजेता निशांत रॉय बोम्बार्डेच्या ‘गैर’ची न्यूयॉर्क फिल्म फेस्टिवलसाठी निवड

सध्या मराठी चित्रपट जगतात तयार होणारे अनेक नाविन्यपूर्ण विषयांवरील चित्रपट सगळीकडेच कौतुकाचा विषय ठरले आहेत. नवनवीन तयार होणारे मराठी चित्रपट आणि त्यांच्या दर्जेदार कथा यांमुळे सध्या सगळीकडेच मराठी चित्रपट आणि दिग्दर्शकांचे कौतुक होत आहे. आता पुन्हा एकदा मराठी चित्रपटांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. अमेरिकेतील न्यू यॉर्क येथे रंगणाऱ्या न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवलमध्ये, राष्ट्रीय पुरस्कार विजेता निशांत रॉय बोम्बार्डे लिखित आणि दिग्दर्शित ‘गैर’ या शॉर्ट फिल्मची ‘शॉर्टस्’ या विभागामध्ये निवड करण्यात आली आहे. ह्या फेस्टिवलमधे या चित्रपटाचा वर्ल्ड प्रिमियर देखील होणार आहे. त्यामुळे चित्रपटाचे दिग्दर्शक सुशांत रॉय बोंम्बार्डेवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

याबाबत संपूर्ण माहिती अशी की, न्यू यॉर्कमध्ये पार पडणाऱ्या चित्रपट महोत्सवामध्ये ‘गैर’ या मराठी लघुपटाची निवड झाली आहे. या चित्रपटाची कथा पंकज आणि राहुल या तरुणांची आहे. ज्यामध्ये पंकज गावाकडून आलेला साधा सरळ मुलगा आणि राहुल आधीपासूनच दिल्लीत आई वडिलांसोबत राहणारा, ऐशारामी मुलगा अशी कथा दाखवण्यात आली आहे. हे नव शहर, नव जग अनुभवणारा पंकज आणि चंचल स्वभावाचा राहुल यांच्या प्रेमळ मैत्रीचे पैलू उलघडण्यात आले आहेत. अभिनेत्यांचा अभिनय आणि कथा यांमुळे हा चित्रपट सगळीकडेच चर्चेत आहे.

यामध्ये अभिनेता तन्मय धनानिया आणि साहिल मेहता यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. चित्रपटाचा दिग्दर्शक सुशांत रॉयने याआधी फँन्ड्री, एलिजाबेथ एकादशी, किल्ला आणि सैराट या गाजलेल्या चित्रपटांमध्ये कार्यकारी निर्मात्याचे काम केले आहे. हे सर्वच चित्रपट प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरले होते. त्याआधी सुशांतला त्याच्या पहिल्याच शॉर्टफिल्मसाठी सर्वोत्कृष्ठ पदार्पणाचा पुरस्कार मिळाला होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-  

हे देखील वाचा