Saturday, June 29, 2024

‘वंडर वुमन’ गॅल गॅडोटने सेटवरून केले ब्रेस्ट मिल्क पंपचे फोटो शेअर; निभावतेय दुहेरी भूमिका

काही दशकांपूर्वी स्त्रियांसाठी सार्वजनिक ठिकाणी स्तनपान करणे किंवा याबद्दल बोलणे देखील खूप अवघड काम मानले जायचे, निदान आपल्या देशात तरी. मात्र, काळ बदलला आणि आज स्त्रिया याबद्दल भरभरून जगासमोर बोलताना दिसतात. सार्वजनिक ठिकाणी स्तनपान देखील करतात. आपल्या देशापेक्षा पाश्चात्य देशांमध्ये या गोष्टी अगदी सर्रास होतात. मागील काही वर्षांपासून आपल्या देशातही यावर बोलणे सुरू झाले आहे. अभिनेत्री स्तनपानाच्या बाबतीत उदासीन असतात, असा अनेकांचा गोड गैरसमज असतो. मात्र, आज तर या अभिनेत्रीच पुढे येत या विषयावर बोलताना दिसतात. नुकतेच हॉलिवूड अभिनेत्री  गॅल गॅडोटने तिच्या ब्रेस्‍ट मिल्‍क पंप करत असतानाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

‘वंडर वुमन’ म्हणून ओळखली जाणारी ‘गॅल गॅडोट’ नेहमी तिच्या बोल्ड वक्तव्यांमुळे चर्चेत असते, आणि लोकांचे लक्ष वेधून घेते. मात्र, आता तिने तिचे दोन असे फोटो पोस्ट केले आहे, ज्यामुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे. गॅलने तिचे ब्रेस्‍ट मिल्‍क पंप करत असतानाचे दोन फोटो शेअर केले आहे. (Gal Gadot Shares Pictures Of Pumping Breast Milk On Set)

या फोटोंमध्ये ती खुर्चीत बसलेली दिसत असून, तिचा मेकअप आणि हेअर केले जात आहेत. यावेळेस तिने ब्रेस्‍ट मिल्‍क पंपदेखील लावला आहे. हे फोटो पाहिले, तर ती यात अतिशय नॉर्मल आणि कम्फर्टेबल दिसत आहे. शिवाय तिच्या चेहऱ्यावर आनंद दिसत असून, तिसऱ्यांदा आई झाल्याचे तेजही चमकत आहे. हे फोटो शेअर करत तिने लिहिले, “बस मी बॅकस्टेजला, आई होण्याच्या नात्याने.” गॅलला तीन मुली असून, तिसऱ्या मुलीचा जन्म काही महिन्यांपूर्वीच झाला आहे.

सध्या गॅल शूटिंग आणि तिचे मदरहूड या दोन ड्युटी सोबत करताना दिसत आहे. हे फोटो शेअर करत गॅलने त्या अभिनेत्रींच्या रांगेत स्थान मिळवले आहेत, ज्यांनी ब्रेस्टफीडिंग आणि ब्रेस्‍ट मिल्‍क पम्‍पिंग याना अतिशय सामान्य बाब सांगितली आहे. गॅलला या मुलींआधी अल्मा वर्सानो आणि माया या दोन मुली आहेत. गॅलचा नवरा रियल इस्टेट डेव्हलपर आहे. सध्या गॅलचा हा फोटो चांगलाच व्हायरल होत असून, तिच्या या फोटोमुळे तिचे कौतुक देखील केले जात आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-हम साथ साथ है! रिया कपूरच्या लग्नानंतर पुन्हा एकत्र आले ‘कपूर खानदान’, सोनम कपूरने केले फोटो शेअर

-व्हिडिओ: राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टी पहिल्यांदाच दिसली सेटवर; चेहऱ्यावर होती उदासी

-‘बेलबॉटम’ रिलीझ होण्यापूर्वीच अक्षय कुमार पोहोचला लंडनमध्ये; ‘खिलाडी’ने घेतलीय मोठी रिस्क?

हे देखील वाचा