बॉलिवूडमधील प्रसिद्ध आणि यशस्वी दिग्दर्शक म्हणून राजकुमार संतोषी ओळखले जातात. त्यांनी आजवर अनेक सुपरहिट सिनेमे केले आहे. फटा पोस्टर निकाल हिरो या शाहिद कपूरच्या सिनेमानंतर त्याचा एकही सिनेमा आला नाही. आता लवकरच त्याचा अतिशय वेगळ्या आणि हटके विषयावरील ‘गांधी गोडसे एक युद्ध’ हा सिनेमा येणार आहे. सिनेमाच्या नावातच बरेच काही सामावले आहे. मागील अनेक दिवसांपासून प्रेक्षक आणि इंडस्ट्रीमधील लोकांमध्ये या सिनेमाबद्दल चर्चा सुरु आहे. उत्कंठावर्धक टिझर पाहिल्यानंतर आता या सिनेमाचा बहुप्रतीक्षित असा ट्रेलर आला आहे.
‘गांधी गोडसे’ या सिनेमाच्या ट्रेलरची सुरुवात स्वतंत्रता आणि फाळणी यानंतर झालेल्या दंगलीवरून होते. या सर्वांसाठी गोडसे गांधी यांना जबाबदार ठरवतात आणि त्यांना मारण्याचा प्लॅन करतात. यादरम्यान गोडसे म्हणतात की ‘मला हिंदुत्वावर गर्व आहे. यासाठी मी जीव देऊ शकतो आणि जीव घेऊ देखील शकतो. आता गांधी यांना मारावे लागेल.’ पुढे अचानक एक ट्विस्ट येत नेहरू सांगतात की, गांधी जिवंत आहे. ते बरे होतात त्यानंतर ते गोडसे यांना भेटण्याची इच्छा व्यक्त करतात.
गांधी गोडसे यांना तुरुंगात भेटायला जातात आणि इथूनच सुरु होते विचारांमधील शाब्दिक युद्ध. जिथे गांधी हे हिंसेच्या विरोधात होते, तर गोडसे हे देशासाठी हिंसा करण्यास देखील कचरत नाही. या वैचारिक युद्धात गोडसे गांधी यांच्यावर फाळणी करण्याचा आरोप करतात. यावर गांधी हा आरोप नाकारतात. यावर गोडसे गांधींना त्यांनी त्यांचेवर केलेल्या हल्ल्याबद्दल त्यांना पश्चताप नसल्याचे सांगतात यावर गांधी म्हणतात, ते इतिहास ठरवेल.
सिनेमातील एक एक संवाद अंगावर शहारा आणणारा आहे. शिवाय कलाकारांचा अभिनय देखील अतिशय दमदार दिसत असून, ए.आर. रहमान यांचे सुंदर संगीत सिनेमाला लाभले आहे. या सिनेमातून संतोषी यांची मुलगी तनिषा बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. ‘गांधी गोडसे एक युद्ध’ हा सिनेमा येत्या २५ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘छोरी २’ सिनेमाच्या सेटवर जखमी झाली नुसरत भरुचा, व्हायरल झाला व्हिडिओ
शाहरुख खान ठरला खरा ‘रईस’, श्रीमंत कलाकारांच्या यादीत हॉलिवूड स्टार्सला देखील टाकले मागे