Friday, December 8, 2023

जगाला अहिंसेचा धडा देणाऱ्या महात्मा गांधीजींच्या आयुष्यावर आधारित सिनेमे, एका क्लिकवर पाहा यादी

चित्रपट फक्त मनोरंजनाचे साधनच नाही, तर समाजातील होणाऱ्या कोणत्याही समस्यावर सामाजिक संदेश पोहोचवण्याचे प्रभावशाली माध्यम आहे. चित्रपटाद्वारे एकसोबत अनेक लोकांना साध्या आणि सोप्या पद्धतीने संदेश पोहोचवता येतो.  02 ऑक्टोबर दिवशी पूर्ण देश राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली. महात्मा गांधीजींचे जीवन प्रत्येकालाच अहिंसेच्या मार्गाने जाण्यास शिकवते. त्यांच्या आयुष्यावर अनेक चित्रपट बनले आहेत. या चित्रपटाद्वारे गांधीजीचे विचार आपण कशाप्रकारे स्वीकारले पाहिजे, हे दाखवले आहेत. आज या यादीत आपण अशाच चित्रपटांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

लगो रहो मुन्ना भाई
गांधीजींचे चित्रपट म्हटलं की, आपल्या डोळ्यासमोर लगेच संजय दत्त (Sanjay Dutt) याचा ‘लगे रहो मुन्ना भाई’ हा चित्रपट येतो. हा चित्रपच वृद्ध व्यक्तीपासून ते लहान वयातील मुलांना संदेश देण्यासारखा आहे. या चित्रपटामध्ये गांधीजीच्या विचारांना सामान्य लोकांपर्यंत पोहोचवले आहे. देशाला शांततेचा आणि अहिंसेचा मार्ग दाखवला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार हिरानी यांनी केले असून हा चित्रपट 2006 साली प्रदर्शित झाला होता. यामध्ये संजय दत्तसोबत विद्या बालन (Vidya Balan), अर्शद वारसी (Arshad Warsi) आणि बोमन ईराणी (Boman Irani) या कलाकारांनी मुख्य भूमिकेत काम केले होते. या चित्रपटामध्ये संजयच्या स्वप्नामध्ये गांधीजी येतात. त्याला सत्य आणि अहिंसेच्या मार्गावर घेऊन जातात. या चित्रपटामध्ये गांधीजीची भूमिका दिलीप प्रभावळकर (Dilip Prabhavalkar) यांनी साकारली होती.

गांधी माय फादर
महात्मा गांधी यांच्या जीवनावर आधारित चित्रपट ‘गांधी माय फादर’ हा 2006 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये महात्मा गांधी आणि त्यांचा मुलगा हिरालाल गांधी यांच्यामध्ये असलेल्या संबंधाबद्दल दाखवले आहे. या चित्रपटामध्ये बापूची भूमिका जरीवाला यांनी निभवली होती आणि त्यांचा मुलगा हिरालाल याची भूमिका अक्षय खन्ना (Akshay Khanna) याने केली होती. या दोघांच्या अभिनयाचे खूप कौतुक केले होते.

द मेकिंग ऑफ द महात्मा
‘द मेकिंग ऑफ द महात्मा’ या चित्रपटाचे दिग्दर्शन श्याम बेनेगल यांनी केले होते. हा चित्रपट 1996मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये बापू यांचा दक्षिण आफ्रिकेमधील 21 वर्षांचा जीवनप्रवास चित्रीत केला आहे. बापूची भूमिका अभिनेता रजित कपूर याने साकारली होती.

गांधी
‘गांधी’ हा चित्रपट महात्मा गांधीजींच्या जीवनावर आधारित आहे. ब्रिटिश-इंडियन चित्रपट ‘गांधी’ यामध्ये हॉलिवूड अभिनेता बेन किंग्स यांनी मुख्य भूमिका साकारली होती. हा चित्रपट 1982 मध्ये प्रदर्शित झाला असून यामध्ये पीरियड बायोग्राफी चित्रित केली आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता रोशन सेठ यांनी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांची भूमिका साकारली होती. या चित्रपटाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले होते.


महत्त्वाच्या बातम्या-
माणूस छोटा विषय मोठा! ‘लागिरं झालं जी’ फेम अभिनेत्याच्या खऱ्या टॅलेंटचं होतंय कौतुक, म्हणाला…
चाळीशी नंतरही सर्वांना हेवा वाटावा, असा फिटनेस ठेवणाऱ्या शिल्पा शेट्टीचे ‘हे’ वेड लावणारे फोटो…

हे देखील वाचा