Wednesday, March 18, 2026
Home अन्य गँगस्टर गोल्डी बराड़कडून पंजाबी अभिनेता गायक गिप्पी ग्रेवाल याला धमकी, म्हणाले भोगावे लागतील गंभीर परिणाम

गँगस्टर गोल्डी बराड़कडून पंजाबी अभिनेता गायक गिप्पी ग्रेवाल याला धमकी, म्हणाले भोगावे लागतील गंभीर परिणाम

गिप्पी ग्रेवाल हा एक पंजाबी अभिनेता-गायक सुध्दा आहे. तो सध्या एका कारणामुळे चर्चेत आला आहे. तर त्याला एक रेकॉर्डिंग ऑडिओ मधून धमकी मिळाली आहे. तर हा गुंड गोल्डी बराड़ने धमकी दिल्याचा एक कथित ऑडिओ आहे. आणि हा ऑडिओ सोशल मीडियावर नुकताच व्हायरल झाला आहे. तर या ऑडिओ क्लिप मध्ये त्याला या धनकीकडे दुर्लक्ष न करण्याचा संदेश दिला आहे नाहीतर परिणाम यांना सामोरे जावे लागणार आहे असे म्हटले आहे.

दरम्यान, शिरोमणी अकाली दल  प्रमुख सुखबीर सिंग बादल यांनी कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यांवरून आम आदमी पार्टी सरकारवर टीका केली. 2022 मध्ये झालेल्या गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येतील आरोपींपैकी गोल्डी ब्रार एक आहे. हे महत्वाची गोष्ट आहे की गुंड गोल्डीने पंजाबी चित्रपट कलाकारांना धमकी देण्याची ही पहिली वेळ नाही. त्याने यापूर्वी सलमान खानसह अनेक चित्रपट कलाकारांना धमकी दिली होती, ज्यानंतर त्याची सुरक्षा वाढवण्यात आली होती. आता गोल्डीने गिप्पी ग्रेवाललाही धमकी दिली आहे.

गुंड दिवसाढवळ्या चित्रपटसृष्टीवरील व्यक्तींनवर राज्य करत असत. एवढेच नाही, तर टी-सिरीजचे मालक गुलशन कुमार यांची दिवसाढवळ्या एका गुंडाने हत्या केली होती. मात्र, गेल्या काही वर्षांत हा ट्रेंड लक्षणीयरीत्या कमी झाला होता. पण लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या उदयापासून गुंडांचा प्रभाव वाढत आहे. अलीकडेच, शुभम लोंकर नावाच्या गुंडाने रोहित (Rohit)शेट्टीच्या घरावर गोळीबार करण्याचे आदेशही दिले होते. गोल्डी आणि लॉरेन्स एकेकाळी एकाच टोळीत होते, पण नंतर त्यांनी आपापल्या गटांची निर्मिती केली.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

साउथची 8.4 IMDb रेटिंग असलेली जबरदस्त फिल्म, क्लायमॅक्स पाहून तुमच्याही अंगावर येतील शहारे

हे देखील वाचा