Monday, July 1, 2024

दरोड्यावेळी बलात्काराच्या भितीने कापत होती ‘ही’ अभिनेत्री; सांगितला भयानक अनुभव

दाक्षिणात्य चित्रपटांनंतर अभिनेत्री निकिता रावलने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. ती आतापर्यंत अनेक छोट्या- मोठ्या चित्रपटांमध्ये दिसली आहे. बॉलिवूड अभिनेत्री निकिता अलीकडेच एका भयानक प्रसंगातून गेली. जेव्हा अभिनेत्री दिल्लीत होती, तेव्हा तिला बंदुक दाखवून दरोडेखोरांनी ७ लाख रुपये लुटले. निकिताला मास्क घातलेल्या काही लोकांनी ओलीस ठेवले होते. निकिता दिल्लीच्या शास्त्रीनगर भागात तिच्या मावशीच्या घरी जात होती, तेव्हा ही घटना घडली.

निकिता रावलने केलं स्वतःला कपाटात बंद
माध्यमातील वृत्तानुसार, निकिताने या घटनेविषयी बोलताना सांगितले की, “मी अजूनही या धक्क्यातून बाहेर पडू शकले नाही आणि मी जिवंत आहे यावर माझा विश्वास बसत नाही. जर मी या परिस्थितीशी लढा दिला नसता, तर मी मेले असते. मी अक्षरशः स्वतःला एका कपाटात बंद केले होते.”

बंदुक दाखवून दरोडेखोरांनी निकिता रावलच्या वस्तू लूटल्या
निकिताने तिच्या आयुष्यातील सर्वात भयानक आणि वेदनादायी घटना घडली असल्याचे म्हटले आहे. निकिता म्हणाली की, “ही घटना रात्री १०च्या सुमारास घडली होती. मी माझ्या मावशीच्या घरी जात होते, तेव्हा एक वेगाने चालणारी इनोव्हा कार अचानक माझ्याजवळ येऊन थांबली. मास्क घातलेले ४ गुंड या कारमधून उतरले आणि त्यांनी मला बंदूक दाखवली. त्यांनी मला धमकी दिली आणि माझ्याजवळ ज्या काही वस्तू आहेत, त्या सर्व माझ्याकडून हिसकावून घेतल्या.”

निकिताला वाटत होत की, ते बलात्कार तर करणार नाहीत ना?
“मी विचार करत होते की, ते मला मारतील, जरी त्यांनी माझे सर्व सामान हिसकावून घेतले होते. परंतु तरीही मला खूप भीती वाटत होती की, ते माझ्यावर बलात्कार करणार नाहीत ना. मी त्या १० मिनिटांत कोणत्या परिस्थितीतून गेले ते मी सांगू शकत नाही. मी घरी आले आणि स्वतःला कपाटात बंद केले. दुसऱ्या दिवशी सकाळी मला सुरक्षित वाटत नसल्याने मी परत मुंबईला गेले.” असेही निकिता म्हणाली.

निकिता रावल आहे तरी कोण?
निकिता ही एक ३१ वर्षीय अभिनेत्री आहे. तशी मूळची ती मुंबईची. तिने साल २००७ मध्ये ‘मिस्टर हॉट मिस्टर कूल’ मध्ये अभिनय केला आहे. तसेच साल २००९ मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट ‘द हीरो-अभिमन्यु’मध्ये देखील ती झळकली होती. तसेच लवकरच ती अरशद वारसीच्या ‘रोटी कपड़ा और रोमांस’ या आगामी चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनयासह ती एक उत्तम डान्सर देखील आहे. सोशल मीडियावर देखील तिचे अनेक चाहते आहेत.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-मलायका अरोराला आवडतो ‘अशा’प्रकारचा व्यक्ती, मिलिंद सोमणपुढे केला खुलासा

-निधन झाले गायिकेचे, पण सपना चौधरीलाच ठरवले मृत; अफवेने उडाली होती कुटुंबीयांची झोप

-ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे ट्विटर अकाऊंट कायमचे बंद, ‘ही’ आहे शेवटची पोस्ट

हे देखील वाचा