Tuesday, July 9, 2024

‘बोले चुडिया बोले कंगना’ गाण्यावर गौहर खानने लावले ठुमके, पती झैद दरबारने केली लक्षवेधी कमेंट

बॉलिवूडमधील अभिनेत्री आणि मॉडेल गौहर खान आणि सोशल मीडियाचा खूप जवळचा संबंध आहे. ती नेहमीच सोशल मीडियावर तिचे वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ तिच्या चाहत्यांसाठी शेअर करत असते. बऱ्याच वेळा तिच्या सोबत व्हिडिओमध्ये तिचा पती झैद दरबार देखील असतो. अशातच गौहर खानने सोशल मीडियावर एक डान्स व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती ‘बोले चुडिया बोले कंगना’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. या गाण्यात ती देशी अवतारात दिसत आहे.

गौहर खानने तिचा हा व्हिडिओ तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंट वरून शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करून तिने लिहिले आहे की, “हा ट्रेंड मी माझ्या पद्धतीने केला आहे. #desigirl #sonikittisoni चलो #remixwithgauahar करो. शेवटचा सांगा कसा झाला??” तिच्या या डान्स व्हिडिओवर तिचा पती झैद दरबार याने देखील कमेंट केली आहे. त्याने लिहिले आहे की, “वाव माझी देसी पत्नी” या व्हिडिओमध्ये तिने आकाशी रंगाचा ड्रेस घालून देसी ठुमके लावले आहेत. तसेच ती मधे-मधे ऋतिक रोशनच्या डान्स स्टेप फॉलो करताना देखील दिसत आहे.

तिचा हा डान्स व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडत आहे. तिच्या चाहत्यांसोबत अनेक कलाकार देखील या व्हिडिओवर कमेंट करत आहेत. तिच्या एका चाहत्याने कमेंट केली आहे की, “ज्या प्रकारे तू डान्स करत आहेत, त्यानुसार तू बेस्ट डान्सर आहेस.” दुसऱ्या एका युजरने तिचे कौतुक करत लिहिले आहे की,‌ “नेहमी सारखीच सुंदर.”

गौहर खानने या व्हिडिओमध्ये जो ड्रेस घातला आहे. त्या ड्रेसमधील आधी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये तिने वेगवेगळे एक्स्प्रेशन दिले आहेत. यामध्ये तिने तिच्या चाहत्यांना प्रश्न विचारला होता की, यातील तुमच्या आवडीचे एक्स्प्रेशन कोणते? गौहरचा हा व्हिडिओ देखील तिच्या चाहत्यांना खूप आवडला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा