Saturday, June 29, 2024

ईदच्या दिवशी गौहर खानला आली वडिलांची आठवण, वडिलांचा फोटो शेअर करून लिहिली भावुक पोस्ट

भारतात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. सध्या असलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वांना घरातच बसावे लागत आहे. तसेच सध्या शूटिंग बंद असल्याने सगळे कलाकार देखील घरातच आहेत. त्यामुळे सर्वांनी ईद सारखा पवित्र सण त्यांच्या घरातच साजरा केला. बॉलिवूड अभिनेत्री गौहर खानने देखील ईद हा सण तिचा पती जैद दरबार सोबत घरातच साजरा केला. या निमित्त तिचे संपूर्ण कुटुंब एकत्र आले होते. नुकतेच काही दिवसांपूर्वी गौहर खानच्या वडिलांचा मृत्यू झाला. त्यांनतर तिचा हा पहिला सण आहे. यावरून गौहर खानने एक भावुक खास पोस्ट केली आहे.

ईदच्या दुसऱ्या दिवशी गौहर खानने तिची इंस्टाग्राम स्टोरी अपडेट केली आहे. या स्टोरीमध्ये तिने तिच्या वडिलांप्रती असलेले प्रेम देखील व्यक्त केले आहे. तिने तिच्या वडिलांचा फोटो शेअर केला आहे. तिने हा फोटो शेअर करून लिहिले आहे की, “ईदच्या दिवशी मला तुमची खूप आठवण येत आहे. आय लव्ह यू माय स्टाईल आयकॉन, आय लव्ह यू टीचर, आय लव्ह यू पप्पा. मी तुमच्यावर खूप प्रेम करते.”

काही दिवसांपूर्वी गौहरला एक फ्रेम गिफ्ट म्हणून मिळाली होती. तिने या गिफ्टचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर शेअर देखील केला होता. तिने हा व्हिडिओ तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंट वरून शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहून त्याचे चाहते खूपच घाबरले होते.

गौहरला‌‌ मिळालेली ही फ्रेम तिच्या पायावर पडली होती. त्यामुळे तिचा पाय दुखत होता. गौहर खानने हा फोटो इंस्टाग्रामला पोस्ट करून लिहिले होते की, “पाय खूप सुजला आहे. मी ही फ्रेम बघण्यासाठी खूप उत्साहित होते. पण फ्रेम माझ्या पायावर पडली.”

गौहर खान ही तिच्या डान्स स्टाईल मुळेस सर्वत्र प्रसिद्ध आहे. तिने बॉलिवूडमधील अनेक गाण्यांवर तिचा परफॉर्मन्स दिला आहे. तिने ‘नशा नशा’, ‘परदा परदा’, ‘झल्ला वल्ला’, ‘छोकरा जवान’ यांसारख्या गाण्यांवर डान्स परफॉर्मन्स दिला आहे. तसेच ती बिग बॉस 7 मध्ये देखील स्पर्धक होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-दिवंगत अभिनेता इरफान खानचा मुलगा बाबिल खानने मागितली आईची माफी; फोटो शेअर करत म्हणाला…

-काय सांगता! हॉलिवूडमध्ये जाण्यास राखी सावंत सज्ज, ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहत्यांनी पाडला कमेंटचा पाऊस

-डीप नेक बोल्ड ब्लॅक ड्रेसमध्ये उर्वशी रौतेलाच्या जीवघेण्या अदा! पाहून तुम्हीही व्हाल घायाळ

हे देखील वाचा