Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘तेरे नजरो ने दिल पे किया जो असर’, म्हणत अभिनेत्रीने शेअर केला बेडरूममधील मजेशीर व्हिडिओ, होतोय जोरदार व्हायरल

बॉलिवूड आणि टेलिव्हिजन वरील लोकप्रिय अभिनेत्री गौहर खानचा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वावर असतो. ईदच्या दिवशी तिच्या वडिलांच्या आठवणीत तिने एक भावुक केली पोस्ट केली होती. त्यांनतर नुकताच गौहरने तिचा पती जैदसोबत एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती जैदसोबत मस्ती करताना दिसत आहे. हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

गौहरने तिचा हा व्हिडिओ तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ते दोघे बेडवर झोपलेले दिसत आहेत. यामध्ये जैदने त्याचे पाय गौहरच्या मानेवर ठेवले आहेत, त्यामुळे तिची मान दाबली जात आहे. पण नंतर समजते की, ते दोघेही मस्ती करत आहेत. या व्हिडिओच्या बॅकग्राउंडला ‘तेरे नजरो ने दिल पे किया जो असर’ हे गाणे वाजत आहे. या गाण्यावर ती लिप्सिंग करत आहे.

या व्हिडिओमध्ये दोघांचे प्रेम आणि मस्ती दिसत आहे. त्यांचा हा व्हिडिओ त्यांच्या चाहत्यांना खूपच आवडला आहे. तिच्या या व्हिडिओवर कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे.

गौहर आणि जैदने मागच्या वर्षी म्हणजेच 19 डिसेंबर, २०२० रोजी लग्न केले आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यांच्या लग्नानंतर गौहरला खूप ट्रोल केले होते. जैद हा गौहरपेक्षा वयाने खूप लहान आहे. त्यामुळे त्यांना खूप ट्रोल केले जाते. पण सोबतच या जोडीला खूप पसंती देखील मिळते.

गौहर खानच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने अमेझॉन प्राईम व्हिडिओ वरील ‘तांडव’ या वेब सीरिजमध्ये काम केले होते. यामध्ये तिने डिंपल कपाडियाच्या असिस्टंटचा रोल निभावला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अगं बाबोव! आपल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय गाण्यात उर्वशीने घातला होता ‘इतक्या’ कोटींचा ड्रेस; किंमत वाचून तुम्हीही घालाल तोंडात बोटे

-चक्रीवादळामुळे अभिनेत्री दीपिका सिंगच्या घरापुढे पडले झाड, मग काय अभिनेत्रीने झाडासमोरच लावले जोरदार ठुमके; एकदा पाहाच

-‘हे रेकाॅर्डवरुन काढून टाका अध्यक्ष महोदय’, पाहा अभिनेत्री राजेश्वरी खरातने कुणाला केलीय विनंती

हे देखील वाचा