कलाकार आणि पॅपराजी यांचे नाते खूपच खास आणि वेगळे आहे. कलाकारांना वेगवेगळ्या ठिकाणावरून स्पॉट करणे त्यांच्या प्रत्येक बारीक सारीक गोष्टींवर नजर ठेऊन त्यांना कॅमेऱ्यात कैद करत लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम हे पॅपराजी करत असतात. सतत कलाकारांच्या निवासस्थानी, त्यांच्या शूटिंगच्या सेटवर, येण्या जाण्याच्या रस्त्यांवर हे पॅपराजी सतत नजर ठेऊन बसलेले असतात. कलाकर आले की, पॅपराजी एकच गोंधळ करत त्यांचे विविध हावभाव आपल्या कॅमेऱ्यांमध्ये टिपण्याचा प्रयत्न करतात. हे करताना त्यांना आपण कुठे आहोत, आपल्यामुळे काय होत असेल याची पुसटशी कल्पना देखील त्यांना राहत नाही.
आता गौहर खानचेच बघा ना. गौहर खानचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये गौहर खान मार्केटमध्ये फिरताना दिसत असून, तिच्या आजूबाजूला मीडियाच्या आणि पॅपराजीच्या कॅमेऱ्यांचा गराडा आहे. यातून मार्ग काढत ती चालत एक एकपड्यांच्या दुकानाजवळ येते, मात्र तोपर्यंत सर्व पॅपराजी तिचे समोरच्या बाजूने फोटो काढण्यासाठी तिच्या समोरून येतात आणि त्यात तिला जागा देण्यासाठी बाजूला होतात आणि त्यातल्या कोणाचा तरी धक्का शेजारी असणाऱ्या कपड्याच्या दुकानाच्या बाहेर असलेल्या पुतळ्याला लागतो आणि तो पुतळा खाली पडतो. तो पुतळा खाली पडतो आणि तुटतो ते पाहून गौहर डोक्याला हात लावत सर्व पॅपराजीना त्यांच्या या कृत्यामुळे दुकानदाराचे नुकसान झाल्यामुळे ओरडते आणि गाडीत बसून निघून जाते.
सध्या गौहरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, त्यावर नेटकऱ्यांच्या देखील भरपूर कमेंट्स येत आहेत. गौहरचा हा व्हिडिओ विरल भयानी या इंस्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. गौहरच्या कामाबद्दल सांगायचे झाल्यास ती २००७ साली बिग बॉस शोची विजेती ठरली. त्यानंतर गौहरने अनेक चित्रपटांमध्ये सहायक भूमिका, पाहुण्या कलाकाराच्या भूमिका साकारली. तिने ओटीटी माध्यमावर देखील पदार्पण केले असून २०२० साली तिने संगीतकार असणाऱ्या इस्माईल दरबार यांच्या मुलाशी जैदशी लग्न केले.
हेही वाचा :