Friday, March 14, 2025
Home बॉलीवूड अभिनेत्री गौहर खान लवकरच बोलणार कबूल..कबूल..कबूल ! नवरदेव १२ वर्षांनी लहान? पाहा कोण होणार तिचा ‘अहो’

अभिनेत्री गौहर खान लवकरच बोलणार कबूल..कबूल..कबूल ! नवरदेव १२ वर्षांनी लहान? पाहा कोण होणार तिचा ‘अहो’

बॉलीवूड अभिनेत्री आणि मॉडेल गौहर खान लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. जैद दरबार असे तिच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव असून जैद आणि गौहर येत्या २५ डिसेंबरला मुंबईत लग्न करणार आहेत. गौहरने तिच्या अकाऊंटवर स्वतः ही माहिती दिली आहे.

गौहरने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर लग्नाच्या तारखेसंबंधी खुलासा करत एक मेसेजही पोस्ट केला आहे. त्या मेसेजमध्ये गौहर लिहिते, ” मला सांगायला अतिशय आनंद होत आहे की, मी आणि जैद येत्या २५ डिसेंबरला लग्नाच्या सुंदर बंधनात अडकणार आहोत. सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन आम्ही आमचा हा महत्वपूर्ण दिवस फक्त आमच्या कुटुंबीय आणि जवळच्या मित्रपरिवारासोबतच साजरा करणार आहोत.”

Gauahar & Zaid
Gauahar Zaid

तसेच ती पुढे म्हणाली की, “लवकरच आम्ही आमच्या दोघांच्याही नवीन जीवनाचा प्रवास सुरु करीत आहोत. त्यासाठी आम्हाला तुमचे प्रेम, शुभेच्छा आणि आशीर्वादाची गरज आहे. आतापर्यंत मिळालेल्या तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा आणि प्रेमासाठी खूप आभारी आहे”. सोबतच गौहरने तिच्या आणि जैदच्या प्रीविडिंग शूटचे बरेच फोटो देखील शेयर केले आहे. मागच्या अनेक दिवसांपासून या दोघांच्या लग्नाच्या चर्चा चालू होत्या.

गौहरने तिच्या करियरची सुरुवात मॉडेलिंग केली आणि यशराज फिल्म्स ‘रॉकेट सिंह: सेल्समैन ऑफ द ईयर’ या चित्रपटातून तिने बॉलीवूड मध्ये पदार्पण केले. गौहरने बिग बॉसच्या ७ व्या पर्वाचे विजेतेपद मिळवले होते. आता नुकतीच गौहर बिग बॉसच्या १४ व्या पर्वात सिनियर खेळाडू म्हणून आली होती. जैद हा संगीत दिग्दर्शक इस्माईल दरबार यांचा मुलगा असून तो बॉलीवूड मध्ये नृत्यदिग्दर्शक आहे.

दरम्यान मागील काही दिवसांपासून जैद दरबार हा गौहरपेक्षा १२ वर्षांनी लहान असल्याचे म्हटले होते. मात्र, नुकतेच गौहरने स्वतः याबद्दल प्रतिक्रिया दिली असून हे सर्व खोटं असल्याचे सांगितले. मात्र, जैदचे नेमकं वय काय याबाबत मात्र खुलासा केलेला नाही.

हे देखील वाचा