बिग बॉस 19’चा ग्रँड फिनाले पार पडला असून गौरव खन्नाने या सीझनचा विजेतेपद पटकावले आहे. शोचे होस्ट सलमान खान यांनी विजेत्याचे नाव जाहीर करताच प्रेक्षकांमध्ये उत्साहाची लाट उसळली. गौरव खन्ना (Gaurav Khanna)यांना बिग बॉस ट्रॉफीबरोबरच 50 लाखांची प्राईज मनी देखील प्रदान करण्यात आली. तर फरहाना भट्ट हिला या सीझनची रनर-अप म्हणून घोषित करण्यात आले.
24 ऑगस्ट 2025 रोजी सुरू झालेला ‘बिग बॉस 19’ हा तीन महिन्यांहून अधिक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन करत ७ डिसेंबर रोजी संपन्न झाला. या वेळी शोची थीम ‘घरवालों की सरकार’ अशी होती, ज्यामुळे घरातील सदस्यांच्या नातेसंबंधांमध्ये, निर्णयांमध्ये आणि टास्कमध्ये वेगळीच कलाटणी पाहायला मिळाली. सलमान खान यांनी पारंपरिक पद्धतीने विजेत्याला ट्रॉफी आणि रोख पारितोषिक देऊन सीझनचा समारोप केला.
कलर्स टीव्हीवरील हा लोकप्रिय रियलिटी शो या वर्षीदेखील प्रेक्षकांनी भरभरून पसंत केला. सुरुवातीपासूनच आपल्या शांत पण परिणामकारक खेळामुळे गौरव खन्ना चर्चेत होते. ‘सायलेंट बट डेडली’ ही त्यांची स्ट्रॅटेजी घरातील सदस्यांवर आणि प्रेक्षकांवरही प्रभाव टाकणारी ठरली. त्यांच्या गेमप्लेची सलमान खान यांनीदेखील वारंवार प्रशंसा केली. बिग बॉस जर्नीमध्ये त्यांनी कोणत्याही गटबाजीपेक्षा स्वतःच्या बुद्धिमत्तेला आणि सूजबूजेला प्राधान्य दिले. यामुळेच ते प्रेक्षकांचे लाडके स्पर्धक बनले.
गौरव खन्ना यांनी घरात प्रणित मोरे आणि मृदुल तिवारी यांच्यासोबत उत्तम बॉण्डिंग तयार केली, तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही शोमध्ये अनेक चर्चा रंगल्या. अखेरच्या क्षणापर्यंत तगडी टक्कर देत गौरव खन्ना यांनी बाजी मारली आणि ट्रॉफी आपल्या नावावर केली.या सीझनमध्ये प्राईज मनीमध्ये कोणतीही कपात करण्यात आली नव्हती. त्यामुळे विजेता म्हणून गौरव खन्नाला संपूर्ण ५० लाखांचे पारितोषिक मिळाले. मागील सीझनमध्ये करण वीर मेहरा यांना त्याच रकमेसह गौरविण्यात आले होते.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा










