Saturday, June 29, 2024

मुलाला जामीन न मिळाल्याने नाराज झाली गौरी खान, कारमध्ये रडतानाचा व्हिडिओ व्हायरल

आर्यन खानला एनसीबीने अटक केल्यानंतर गुरुवारी किला कोर्टात त्याच्यावर सुनावणी झाली. त्यावेळी त्याची एनसीबी कोठडी रद्द करत त्याला १४ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. या सर्वांमध्ये पुन्हा एकदा शुक्रवारी आर्यनच्या जामीनाबाबत सुनावणी करण्यात आली. पण जामीन काही मिळाला नाही. उलट थेट आर्यनची रवानगी आर्थर रोड जेलमध्ये करण्यात आली.

या सर्वांमध्ये गौरी खान आणि शाहरुख खान खूप दुःखी आहेत. आपल्या मुलाला जामीन मिळवून देण्यासाठी सर्वोतोपरी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. परंतु त्यांच्या प्रयत्नांना अद्याप यश आलेले नाही. अशात गौरी खानचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये गौरी खूप रडताना दिसत आहे.

हा व्हिडिओ तेव्हाचा आहे जेव्हा आर्यन एनसीबीच्या कोठडीत होता. एनसीबीच्या कोठडीत असताना त्याला आणि इतर ७ आरोपींना कुटुंबीयांना भेटण्याची एकदा परवानगी मिळाली होती. त्यावेळी गौरी आणि शाहरुखची मॅनेजर पूजा दादलानी आर्यनला भेटायला गेल्या होत्या. त्याला भेटुन झाल्यावर तिथून निघत असताना गौरी खूप रडू लागली. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका कारमध्ये गौरी बसलेली आहे. तिने स्वतःच्या चेहऱ्यावर हात ठेवला आहे आणि ती रडत आहे. मुलाच्या विरहाने ती खूप व्याकूळ झाली आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

शुक्रवारी झालेल्या सुनावणीमध्ये जामीन न मिळाल्याने आता त्याचे वकिल सतीश मानेशिंदे हे सत्र न्यायालयात त्याचा जामीन अर्ज दाखल करणार आहेत. किला कोर्टाने आर्यनचा जामीन अर्ज फेटाळत त्याची ३ कारणे सांगितली. यातील पहिले म्हणजे किला कोर्टाला जामीन देण्याचा कोणताही अधिकार नाही. दुसरे म्हणजे आर्यनला सोडल्यास त्याच्याकडून पुरव्यांची छेडछाड होण्याची शक्यता आणि तिसरा म्हणजे आर्यनकडे सापडलेल्या चॅटचा संबंध थेट आंतरराष्ट्रीय अं’मली पदार्थांशी आहे. यामुळे त्याला आता आर्थर रोड जेलची हवा खावी लागत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-हिना खानचा ब्रेकअप? अभिनेत्रीच्या लेटेस्ट पोस्टमुळे चाहते पडले चिंतेत

-आर्यन खानला सकाळी ७ वाजता मिळणार जेलमधील जेवण, ‘या’ गोष्टीसाठी तरसणार शाहरुखचा मुलगा

-‘हे नक्की शाल्विताच का?’ ओम अन् स्वीटूच्या ‘त्या’ व्हिडिओवर रंगल्यात चाहत्यांच्या चर्चा

हे देखील वाचा