Friday, April 25, 2025
Home मराठी ‘…मी तुझ्या प्रेमात पडण्यापासून स्वतःला थांबवू शकणार नाही’, म्हणत गौतमी देशपांडेचे नवीन फोटो केले शेअर

‘…मी तुझ्या प्रेमात पडण्यापासून स्वतःला थांबवू शकणार नाही’, म्हणत गौतमी देशपांडेचे नवीन फोटो केले शेअर

मराठी टेलिव्हिजनवर काम करून अनेक अभिनेत्रींनी नाव कमावले आहे. आज अनेक लोकप्रिय आणि प्रसिद्ध असणाऱ्या अभिनेत्रींनी त्यांच्या करिअरची सुरुवात टेलिव्हिजनपासून केली आहे. कारण टेलिव्हिजनवरून कलाकार रोज त्यांच्या प्रेक्षकांना भेटायला घराघरात जातात. अशीच झी मराठीवरील एक मालिका जबरदस्त गाजली होती. यासोबत मालिकेतील सगळी पात्र देखील चांगलीच प्रसिद्ध झाली होती. ती मालिका म्हणजे ‘माझा होशील ना’ होय. या मालिकेची कथा अगदी वेगळी आणि आधुनिक असल्याने प्रेक्षकांनी देखील मालिकेला चांगलाच प्रतिसाद दर्शवला होता.

नुकतेच काही दिवसांपूर्वी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. मालिकेत गौतमी देशपांडे आणि विराजस कुलकर्णी मुख्य भूमिकेत होते. या कलाकारांनी जरी प्रेक्षकांचा निरोप घेतला असला, तरी सोशल मीडियावर ते त्यांच्या चाहत्यांशी नेहमीच जोडून असतात. अशातच गौतमीने सोशल मीडियावर तिच्या नव्या लूकमधील काही फोटो शेअर केले आहेत. (gautami deshpande share her new queen look on social media)

गौतमीने इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने स्किन कलरचा एक शॉर्ट ड्रेस घातला आहे. तसेच गळ्यात आणि हातात मोत्याच्या माळा घातल्या आहेत. तसेच डोक्यावर हॅट घातली आहे. या फोटोमध्ये ती एखाद्या राणीप्रमाणे दिसत आहे. फोटोमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. तसेच तिची गोड स्माईल चाहत्यांना वेड लावत आहे.

हा फोटो शेअर करून तिने कॅप्शन दिले आहे की, “माझा हात घे, माझे संपूर्ण आयुष्य घे, मग मी तुझ्या प्रेमात पडण्यापासून स्वतःला थांबवू शकणार नाही.” तिच्या या फोटोवर तिचे अनेक चाहते त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांना तिचा हा लूक खूप आवडला आहे. तिच्या या फोटोवर हार्ट तसेच फायर ईमोजी पोस्ट करत आहेत.

गौतमी ही टेलिव्हिजनवरील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. सोशल मीडियावर देखील तिची तगडी फॅन फॉलोविंग आहे. तिच्या प्रत्येक पोस्टला तिचे चाहते भरभरून प्रतिसाद देत असतात. तिने ‘माझा होशील ना’ या मालिकेच्या आधी ‘सारे तुझ्याच साठी’ या मालिकेत काम केले आहे. या मालिकेत तिच्यासोबत हर्षद अटकरी मुख्य भूमिकेत होता.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-मल्हार अडकेल का अंतराच्या प्रेमात? योगिताचा नवीन लूक पाहून, चाहत्यांमध्ये रंगलीय एकच चर्चा

-‘मुलं जन्माला घालायला वेळ कधी मिळतो?’, मलायकाने विचारलेल्या प्रश्नावर कपिलचे मजेशीर प्रत्युत्तर, म्हणाला…

-सुखी आयुष्याला ४ वर्षांनी पुर्णविराम! समंथा अन् नागा चैतन्यने घेतला घटस्फोट; जोडप्याच्या निर्णयाने चाहते दु:खी

हे देखील वाचा