Monday, June 24, 2024

माेठी बातमी! कार्यक्रमाच्या आयाेजकांवर गुन्हा दाखल केल्याबाबत गाैतमी पाटीलचं माेठं वक्तव्य म्हणाली,’माझा दोष…’

अगदी कमी वेळातच नृत्यगणा गौतमी पाटीलने महाराष्ट्रात मोठा चाहता वर्ग निर्माण केला आहे. गौतमी तिच्या डान्ससाठी खूप प्रसिध्द आहे. गौतमीवर कितीही आरोप झाले तरीही तिच्या चाहत्यांच्या संख्येत खूप वाढ होताना दिसत आहे. या चाहत्यांच्या गर्दीमुळे गौतमी कित्येकदा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. दरम्यान, सध्या गौतमी एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेचा विषय ठरत आहे. काय आहे ते कारण जाणून घेऊया…

गौतमीचा (Gautami Patil) डान्स सुरू असतानाच्या होणाऱ्या हाणामारी आणि राडे प्रचंड वाढत आहेत. दुसरीकडे, आता ती तिच्या आडनावावरून वादाच्या भोवऱ्यात आडकली आहे. तिच्या आडनावावरून आनखी मोठा वाद पेटण्याची शक्यता आहे. अशातच गेल्या काही दिवसांपासून कार्यक्रमादरम्यान होणाऱ्या वादांमुळे अनेक ठिकाणी आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. इतकच नाही तर वाद होऊ नये म्हणून कार्यक्रमाच्या ठिकाणी आयोजकांनी पोलिस बंदाेबस्त सुद्धा केले आहे, पण तरीही अशी प्रकरणे थांबण्याच नावच घेत नाहीत.

गौतमी आपल्या नजरेच्या इशाऱ्याने चाहत्यांना घायाळ करते. त्यामुळे ती मागच्या आठ-दहा महिन्यांपासून महाराष्ट्रात सातत्याने चर्चेत आहे. या दरम्यान गौतमीला बार्शी, विरारसह अनेक ठिकाणी झालेल्या कार्यक्रमातील वादांविषयी काही प्रश्न विचारण्यात आले आहेत. याविषयी माध्यमांशी बोलताना गौतमी म्हणाली, “कार्यक्रमादरम्यान वाद होतात. त्यात माझा काय दोष आहे. मात्र, तरीही प्रत्येकाच्या ओठावर सर्वात पहिल नाव माझच असते. तिथ मलाच पुढे केल जात, पण माझा आणि कार्यक्रमाच्या आयोजकांचा काडीमात्र संबध नसतो.”

दरम्यान, गौतमी सोशल मीडिया स्टार आहे. तिने खूप कमी वेळात प्रचंड प्रसिद्धी मिळवली असुन गौतमी हे नाव माहित नाही अशी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. आपल्या अश्लील डान्समुळे, विवादित वक्तव्यांमुळे आणि या ना त्या कारणामुळे तिच्यावर होणाऱ्या सततच्या टीकेमुळे गौतमी नेहमीच चर्चेत येत असते. कोणत्याही मोठ्या कलाकाराला मिळेल एवढे लक्ष तिला सोशल मीडिया आणि लोकांकडून मिळते.(Gautami Patil made a big statement regarding the filing of cases against the organizers)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही नक्की वाचा-
पहचान कौन! बाॅलिवूडच्या ‘या’ सुपर हॉट अभिनेत्रीने साेशल मीडियावर केला कहर, फाेटाे व्हायरल
गायत्री दातार इटलीमध्ये घेतेय सुट्ट्यांचा आनंद, फाेटाे व्हायरल

हे देखील वाचा